तुमचा विश्वास बसणार नाही दीपिकाने सलमानसोबत केलं काम; त्यानंतर...
सलमानने अनेक नवीन कलाकारांना बॉलिवूडमध्ये संधी दिली.
मुंबई : बॉलिवूडचा दबंग खान अर्थातचं अभिनेता सलमान खान कायम चर्चेत असतो. त्याच्या विषयी चर्चा रंगण्याचं कारण म्हणजे त्याचे सुपरहीट चित्रपट. सलमानसोबत स्क्रिन शेअर करण्याचं बॉलिवूडमधील प्रत्येक अभिनेत्रीचं स्वप्न असतं. सलमानने अनेक नवीन कलाकारांना बॉलिवूडमध्ये संधी दिली. आज ते कलाकार देखील यशाच्या शिखरावर आहेत. सलमानने संधी दिलेल्या कलाकारांच्या यादीत अभिनेत्री दीपिका पादुकोणचं देखील नाव आहे. रूपेरी पडद्यावर दीपिका आणि सलमान खानची जोडी कधीचं दिसली नाही. पण दीपिकाने सलमानच्या एका चित्रपटात काम केलं आहे.
सलमानच्या एका चित्रपटात दीपिका झळकली होती, याकडे फार कमी प्रेक्षकांचं लक्ष गेलं. 2009साली प्रदर्शित झालेल्या 'मैं और मिसेस खन्ना' (Main Aur Mrs Khanna) चित्रपटात दीपिका दिसली होती. या चित्रपटात अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan), सलमान खान (Salman Khan), आणि सोहेल खान (Sohail Khan) मुख्य भूमिकेत दिसले होते.
'मैं और मिसेस खन्ना' चित्रपटात अगदी शेवटी दीपिकाची एन्ट्री झाली. चित्रपटात सोहेल आणि दीपिका ही जोडी कॅमेऱ्यात कैद झाली होती. सांगायचं झालंतर दीपिकाने अभिनयाच्या प्रवासात छोट्या भूमिकापण साकारल्या. पण आता दीपिका बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. अनेक चित्रपटांच्या माध्यमातून तिने चाहत्यांच्या मनात राज्य केलं आहे.
दीपिकाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ती लवकरचं '83' चित्रपटात झळकणार आहे. '83' चित्रपटात दीपिका अभिनेता रणवीर सिंगच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. याशिवाय ती अभिनेता शाहरूख खानच्या 'पठान' आणि 'फायटर' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्याच्या भेटीस येणार आहे.