मुंबई : कृषी कायद्याविरोधात गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांचे देशव्यापी आंदोलन सुरू आहे. आंदोलनाने देशव्यापी स्वरूप घेतल्यानंतर सर्वच स्तरातील मंडळी आपलं मत मांडत आहेत. अनेक बॉलिवूड कलाकारांनी देखील सरकारच्या पक्षात आपली प्रतिक्रिया दिली. अभिनेता अक्षय कुमार, सुनील शेट्टी, अजय देवगन,  अभिनेत्री कंगना रनौत यांनी शेतकरी अंदोलनाप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. आता दबंग खान अर्थात अभिनेता सलमान खानने देखील प्रतिक्रिया दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान देशात होत असलेल्या देशव्यापी अंदोलनाप्रकरणी सलमानने स्पष्टीकरण दिलं आहे. नुकताचने एका कार्यक्रमादरम्यान सलमान  म्हणाला, 'जे काम योग्य आहे. ते झालचं पाहिजे. सर्वात उत्तम काम झालं पाहिजे.' सलमानला आंदोलनाप्रकरणी प्रश्न विचारल्यानंतर त्याने उत्तम काम झालं पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली. 


दरम्यान, याआधी परराष्ट्र मंत्रालयाने  #IndiaTogether आणि #IndiaAgainstPropaganda या हॅशटॅगसह स्पष्टीकरण दिलं. त्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी सरकारचं समर्थन केलं. तर दुसरीकडे अनेकांना शेतकऱ्यांची बाजू मांडली.



सलमानच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच तो  'राधे' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सलमानचा सरदार लूक प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री दिशा पटनी आणि अभिनेता आयुष शर्मा देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.