मुंबई : बॉलिवूडमध्ये सलमानच्या लग्नच्या चर्चा आता तुलनेनं कमी झाल्या असल्या तरीही परदेशी सुंदरी यूलिया वंतूर (Iulia Vantur) हिच्याशी असणारं त्याचं नातं, मात्र कायमच बऱ्याच विषयांना वाव देतं.  (Salman Khan) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खान कुटुंबातील कार्यक्रम म्हणू नका किंवा मग एखादा इव्हेंट, सलमानसोबत कायमच यूलिया दिसली आहे. 


त्यांच्या या नात्याला अनेकांनी रिलेशनशिपचं, प्रेमाचं नावही दिलं. पण, आता म्हणे सलमानच्या याच खास मैत्रीणीनं आता त्याच्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. 


तिनं असा निर्णय का घेतला याचा खुलासा तिच्याकडूनच करण्यात आला आहे. 


आपल्यासोबत सलमानचं नाव जोडलं जाण्याचे अनेक फायदेही आहेत आणि तोटेही, असं तिचं मत. 


सलमान एक खूप चांगल्या मनाचा व्यक्ती आहे, हे ती नाकारत नाही. पण, आपली अशी वेगळी ओळखही असली पाहिले अशीच तिची इच्छा आहे. 


माध्यमांशी संवाद साधताना यूलिया म्हणाली, 'सलमान खूप चांगला व्यक्ती आहे, तो एक उत्तम अभिनेता आहे. या क्षेत्राचा त्याला फार अनुभव आहे. त्याच्या आजुबाजूला राहूनही खूप काही शिकता येतं', असं ती म्हणाली. 


सलमानशी असणारं हे नातं ठीक. पण, यूलियाचीही काही मतं आहेत. मला स्वत:ची ओळख तयार करुन त्या बळावर काम करायचं आहे. मी यावरही काम करतेय, असं तिचं म्हणणं. 


मला इथे अजूनही लोक नीट ओळखत नाहीत. पण, मीसुद्धा काम करतेय आणि त्यासाठी मला असं करणं (सलमानच्या छत्रछायेपासून दूर राहणं) गरजेचं होतं, असंही ती म्हणाली. 


सलमानच्या वर्तुळातून बाहेर पडण्यासाठीचे प्रयत्न तिनं नाकारलेले नाहीत. याचे फायदे आणि नुकसानही ती जाणते. 


पण, अशापरिस्थितीमध्ये सरतेशेवटी आपल्याला मेहनत करावीच लागते हे वास्तवही ती नाकारत नाही. आपल्याला आपल्या नावानं ओळखलं जावं, कोणाशी आपलं नाव जोडलं आहे म्हणून आपली ओळख नसावी यासाठी यूलिया आग्रही आहे. 


आत्मसन्मान आणि आत्मनिर्भरतेसाठी तिनं हा निर्णय घेतल्याचं कळत आहे. 


सलमानशी असणारी मैत्री आणि त्याच्यासोबत असणारं खास नातं, हे सर्वकाही टिकवून ठेवत आता यूलिया तिची नवी ओळख तयार करण्याच्या प्रयत्नांत आहे, तिच्या या प्रयत्नांना आता कितपत यश मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.