मुंबई : सलमान खान हा आज बॉलिवूडचा सुपरस्टार आहे, दबंगस्टार आहे. २७ डिसेंबरला सलमान वयाची ५२ वर्ष पूर्ण करणार आहे. काही व्यक्तींंसाठी वय हा केवळ अंकांचा खेळ असतो. त्यापैकीच एक म्हणजे सलमान खान. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२२ डिसेंबरला सलमानचा ' टायगर जिंंदा है' रिलीज झाला. सध्या या चित्रपटाने १५० कोटींपेक्षा अधिक गल्ला जमवला आहे. पण काही वर्षांपूर्वी चित्र फारच वेगळं होतं. सलमान खान हा स्टारपुत्र असला तरीही त्याच्या वाटेला काही सिनेमांंच्या बाबतीत निराशा आली होती. अचानक त्याचेही काही प्रोजेक्ट बंद पडले होते. पहा अशाच त्याच्या काही प्रोजेक्टसची लिस्ट ...  


सलमान खान आणि भाग्यश्री यांना 'मैने प्यार किया..' या चित्रपटानंतर पुन्हा एकत्र पाहण्याची संधी १९९० साली 'रण क्षेत्र' या चित्रपटातून मिळणार होती. पण भाग्यश्रीचे हिमालय दासानींशी लग्न झाले आणि हे प्रोजेक्ट बंद पडले.  


९० च्या दशकामध्ये ' चोरी मेरा काम' हा अजीज सेजवाल दिग्दर्शित चित्रपटामध्ये सुनील शेट्टी, शिल्पा शेट्टी, काजोल अशी स्टारकास्ट होती. मात्र ५० % काम झाल्यानंतर अचानक या चित्रपटाचे प्रोडक्शन बंद करण्यात आले. या चित्रपटातील एक स्टंट सीन नंतर थम्स अपच्या अ‍ॅडमध्ये वापरण्यात आला.  


१९९१ साली राजकुमार संतोषी दिग्दर्शित ' दिल है तुम्हारा' या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात झाली. पहिल्या  शेड्युलनंतर बॉबी देओलला 'बरसात' आणि सलमान खानला राजकुमार यांचा ' अंदाज अपना अपना' हा चित्रपट मिळाला आणि ' दिल है तुम्हारा'चं शूटींग बारगळलं. 


१९९१ साली राजकुमार संतोसः यांनी ' घेराव' या चित्रपटाचीही घोषणा केली होती. मुहुर्तानंतर अचानक या चित्रपटाची निर्मिती थांबवण्यात आली.   


१९९१ सालीच करिष्मा कपूर, दिव्या भारती, अरबाज खान यांच्या सोबत ' ए मेरे दोस्त' या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले. नदीम श्रवण यांनी गाण्याचं रेकॉर्डिंगही केले होते. मात्र नंतर या प्रोजेक्टचे काम थांबले. 


१९९४ साली 'राम' हा चित्रपट सोहेल खान दिग्दर्शित करणार होता. या चित्रपटाचे ४० % शूट पूर्ण झाले होते. मात्र प्रोड्युसर मंसूर सिद्दीकी यांच्यासोबत वाद झाल्याने या चित्रपटाचे काम बारगळले.  


१९९७ साली 'राजू राजा राम' चे काम चालू होते. ७० % काम झाल्यानंतर आर्थिक चणचण आल्याने या चित्रपटाचे पुढील काम थांबवण्यात आले. डेविड धवन या चित्रपटाचे दिग्दर्शन करत होता.  


१९९७ साली संजय दत्त, रविना टंडन आणि शिल्पा शेट्टीची ' दस' ही फिल्म आली. या चित्रपटाचे ४० % काम पूर्ण झाल्यानंतर आचानक दिगदर्शक मुकुल एस आनंद यांचे निधन झाले. त्यानंतर त्याच्या भावाने पुढील काम हाती घेतले पण पूर्ण झाले नाही. 


१९९७ साली ' आंख मिचोली' या चित्रपटामध्ये सलामान खान डबल रोलमध्ये दिसणार होता. 'जुडवा' नंतर सलमानला पुन्हा डबल रोल करायचा नव्हता. त्यामुळे हा चित्रपट बारगळला. 


१९९९  साली राजकुमार संतोषी यांच्या ' महाभारत' या ड्रीम प्रोजेक्टचा सलमानदेखील एक भाग होता.पण हा प्रोजेक्ट सुरूच झाला नाही.