सलमान म्हणाला, माझ्यासाठी ही जागा नवीन नाही
बहुचर्चित काळवीट शिकार प्रकरणी २० वर्षानंतर ५ एप्रिलला याबाबतचा निर्णय़ सुनावण्यात आला. या प्रकरणात चार कलाकारांना निर्दोष सुटका करण्यात आलीये. तर सलमानला ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीये. आज सलमानच्या जामीन अर्जावरील निर्णय कोर्टाने राखून ठेवला. याचा निर्णय उद्या होणार आहे. त्यामुळे सलमानला बेल मिळणार की सलमान जेलमध्ये राहणार हे उद्याच कळेल.
जोधपूर : बहुचर्चित काळवीट शिकार प्रकरणी २० वर्षानंतर ५ एप्रिलला याबाबतचा निर्णय़ सुनावण्यात आला. या प्रकरणात चार कलाकारांना निर्दोष सुटका करण्यात आलीये. तर सलमानला ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीये. आज सलमानच्या जामीन अर्जावरील निर्णय कोर्टाने राखून ठेवला. याचा निर्णय उद्या होणार आहे. त्यामुळे सलमानला बेल मिळणार की सलमान जेलमध्ये राहणार हे उद्याच कळेल.
सलमान जेलमधील पहिल्या रात्री खूप बेचैन होता. सलमान खानला बराक मंबर २मध्ये आसारामसह ठेवण्यात आले होके. तर दुसरीकडे सलमानने जेलचे कपडे आणि जेवण्यासही नकार दिला. सलमान खान पहिल्यांदाच जेलमध्ये गेलेला नाहीये.
याआधीही सलमान खान जोधपूरच्या सेंट्रल जेलमध्ये १८ दिवस राहिलाय. आपल्या जेलमधील अनुभवांबाबत डीएनएशी बोलताना सलमान म्हणााला, जेल ही खूप वाईट जागा आहे. येथील ७० टक्के कैदी निरपराध आहेत. सलमान पुढे म्हणाला, जेलमध्ये घाणेरडे टॉयलेट आणि एकच बराकमध्ये ९-१० लोकांना एकत्र रात्र काढावी लागते.
दरम्यान, जामिनाच्या याचिकेवर निर्णय न आल्याने सलमानला आणखी एक रात्र जेलमध्ये काढावी लागणार आहे. यादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार सलमान खानने तुरुंग निरीक्षकांशी दीड तास बातचीत केली. यावेळी त्याने जेलरला अनुभव सांगितले. सलमान जेलरला म्हणाला, सर माझ्यासाठी ही जागा काही नवीन नाही. मी याआधीही येथे आलोय. मात्र तेव्हा तुम्ही नव्हता. येथे बरेच बदल झालेत. मात्र बरंच काही पहिल्यासारखंच आहे.