सलमानच्या सायकल चालविण्यावर पोलिसांनी घातली बंदी
मुंबई पोलिसांनी सलमानला खुलेआम सायकल चालविण्याची परवानगी नाकारली आहे.
मुंबई : सलमान खान यापुढे मुंबईच्या रस्त्यांवर खुलेआम सायकल चालवताना दिसणार नाही. मुंबई पोलिसांनी सलमानला खुलेआम सायकल चालविण्याची परवानगी नाकारली आहे.
सलमानला धमकी
राज्यस्थानचा गॅंगस्टार लारेंस बिश्रोईने सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. दरम्यान रेस ३ च्या शूटींग थांबवून पोलिसांनी सलमानला घरी सोडले.
पोलिसांनी घरी सोडले
हत्यार घेतलेला काहीजण रेस ३ च्या सेट वर येऊ शकतो. सलमानवर हल्ला होऊ शकतो,अशी माहिती पोलिसांना मिळाली होती.
कुठेही जाण्याआधी सोशल मीडियावर पोस्ट करु नये,अन्यथा त्याच्या सुरक्षेला धोका पोहोचू शकतो.
वातावरण खराब करण्याचा डाव
काळे हरण शिकार प्रकरणी सलमानवर केस सुरू असल्याने तो काही लोकांच्या निशाण्यावर आहे. बिश्रोई समाज काळ्या हरीणाची पूजा करतात. अशात काहीजण सलमानला धोका पोहोचवू शकतात.
या प्रकरणी सलमान जोधपूर कोर्टात जात असतो. अशावेळी सलमानला इजा पोहोचवून वातावरण खराब करण्याचा काहींचा डाव असू शकतो असा अंदाज पोलिसांना आहे.