मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकलेल्या जॅकलीनसाठी सलमानचा मोठा निर्णय
जॅकलिनसाठी नक्की काय करणार `डेव्हिड`?
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) मनी लाँड्रिंग प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. चौकशीसाठी अनेकदा जॅकलिनला समन्स देखील पाठवण्यात आला आहे. आता अभिनेता सलमान खान आपल्या खास मैत्रिणीच्या मदतीसाठी मैदानात उतरणार आहे. सध्या सलमान दुबईत असून 10 डिसेंबरला रियाधमध्ये परफॉर्म करणार आहे.
या कार्यक्रमात सलमानशिवाय इतर अनेक स्टार्सही परफॉर्म करणार आहेत. काही काळापूर्वी जॅकलिन फर्नांडिसला कार्यक्रमातून बाहेर काढण्यात आल्याच्या चर्चा रंगल्या होत्या, मात्र आता सलमानने पहिल्यांदाच रंगणाऱ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
'द बँग टूर' संदर्भात सलमान खानची पत्रकार परिषद झाली. यादरम्यान सलमानला विचारण्यात आले की जॅकलीन या कार्यक्रमाचा भाग आहे की नाही? या प्रश्नाला उत्तर देताना सलमान म्हणाला, 'इंशाअल्लाह, ती इथे असेल आणि ती आली नाही तर मी जॅकलिनच्या भूमिकेत परफॉर्म करेन....' असा निर्णय याठिकाणी सलमानने घेतला आहे.
सलमानचे असं वक्तव्य ऐकून सगळे हसले. काही दिवसांपासून मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसची सतत चौकशी होत आहे. अशा परिस्थितीत ती 'द बँग टूर'चा भाग होऊ शकणार नाही, असे मानले जात होते.
मात्र आता जॅकलीनही कार्यक्रमाचा एक भाग असून ती परफॉर्म करणार असल्याचे सलमानने स्पष्ट केले आहे. सलमान आणि जॅकलिनने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. याशिवाय ते दोघे चांगले मित्र आहेत.