मुंबई : अभिनेत्री समंथा रुथ प्रभू गेल्या काही काळापासून सतत चर्चेत आहे. गेल्या वर्षी पती नागा चैतन्यपासून घटस्फोट घेतल्या पासून ती सतत चर्चेत होती. त्यानंतर 'पुष्पा: द राइज' चित्रपटात आणि 'फॅमिली मॅन 2' या वेबसीरिजमध्ये  जबरदस्त अभिनय दाखवणारी समंथा अलीकडच्या काळात खूप चर्चेत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजकाल पुष्पा चित्रपटातील समंथावर चित्रित केलेले 'ओ अंतवा' हे आयटम साँग खूप लोकप्रिय होत आहे. मात्र, या सगळ्याच्या दरम्यान आज आम्ही तुम्हाला सामंथाच्या आयुष्यातील अशा घटनांबद्दल सांगणार आहोत ज्या एकेकाळी खूप चर्चेत राहिल्या होत्या.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, घटस्फोटानंतर नागा चैतन्यने सामंथाला 200 कोटींची मोठी पोटगी दिली होती. मात्र समंथाने ही पोटगी घेण्यास नकार दिला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आजच्या तारखेपर्यंत समंथाची स्वतःची संपत्ती सुमारे 80 कोटी रुपये आहे. समंथा  एका चित्रपटासाठी 2-3 कोटी रुपये घेते. त्याचबरोबर, सामंथा दोन स्टार्टअप देखील चालवते. अभिनेत्रीचे पहिले स्टार्टअप 'साकी' नावाचं फॅशन लेबल आहे. त्याचबरोबर समंथा 'एकम' नावाने प्री स्कूलही चालवते.


मात्र, आज यशाच्या शिखरावर विराजमान झालेल्या समंथासाठी सुरुवातीचे दिवस नेहमीसारखे नव्हते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीच्या कुटुंबाकडे इतके पैसेही नव्हते की, ते तिला 12वी नंतर चांगले शिक्षण देऊ शकतील. बातमीनुसार, समंथाने अगदी लहान वयातच मॉडेलिंगला सुरुवात केली आणि तिने 'ये माया चेसावे' या चित्रपटाद्वारे ग्लॅमरच्या दुनियेत प्रवेश केला. यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिलं नाही.