Samantha Ruth Prabhu : साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू हिचा आगामी तेलगू थ्रिलर सिनेमा (samantha ruth prabhu movies) यशोदा (Yashoda) लवकरच रिलीज होणार आहे. पण या दरम्यान ती एका आजाराला तोंड देत असल्याचं समोर आलं आहे. ती मायोसिटिस (myositis) नावाच्या आजाराचा सामना करत आहे. तिने सोशल मीडियावर ही माहिती शेअर केल्यानंतर तिचे चाहते तिच्यासाठी प्रार्थना करु लागले. अनेक कलाकारांनी देखील तिची विचारपूस केलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समांथा म्हणाली की, काही दिवस चांगले तर काही वाईट असतात. सध्या बेड वरुन उठणे देखील कठीण आहे. मला आणखी काही दिवस लढायचे आहे.' दरम्यान समांथाला झालेला आजार हा जीवघेणा असल्याचं काही लोकं म्हणत आहेत. त्यावर अभिनेत्रीने उत्तर दिलं आहे. ती म्हणाली की, याला तीन महिने झाले आहेत. मी लवकर मरणार नाही. मी बरेच लेख वाचले ज्याच असं म्हटलं की, जीवाला धोका आहे. पण एक स्वयंप्रतिकार स्थिती आहे. याला वेळ लागतो. हा वाईट अनुभव आहे. पण मी नेहमीच लढत राहिल.'



अभिनेत्री समांथाने पुढे खुलाला केला की, 'हा खूप कठीण काळ आहे. ती काही उच्च डोस घेत आहेत. तुम्ही श्रीमंत किंवा प्रसिद्ध असलात तरी काही फरक पडत नाही. प्रत्येकाचा काळ चांगला - वाईट काळ असतो. प्रत्येकाला हे माहित असणे महत्वाचे आहे.'



समांथाला नुकतेच मायोसिटिस नावाच्या आजाराचं निदान झालं आहे. तिने सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली होती. दरम्यान तिचा यशोदा हा सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट 11 नोव्हेंबर 2022 रोजी तेलगू, तमिळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे.