मुंबई : अभिनय क्षेत्रात फार कमी वेळात फार जास्त प्रसिद्धी मिळवणाऱ्या युवा कलाकारांमध्ये समंथा रुथ प्रभू हिच्या नावाचा समावेश होतो. आजची ही प्रसिद्ध अभिनेत्री कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी तिचं घटस्फोट झालं, ज्यामुळे समंथा चर्चेत आली. घटस्फोटानंतर तिची चर्चा रंगली ती म्हणजे 'पुष्पा' (Pushpa)मधील 'ऊं अंटावा' गाण्यामुळे...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'पुष्पा' (Pushpa)मधील 'ऊं अंटावा' या गाण्यानं तर तिला लोकप्रितेच्या अशा टप्प्यावर आणलं जिथून मागे वळूण पाहणंही चूक. यश पदरात असतानाही समंथाने जीवनात एका गोष्टीची खंत वाटत असल्याचं सांगितलं. 



समंथा म्हणाली, 'मी  'ऊं अंटावा' गाण्याला मिळालेल्या यशामुळे आनंदी आहे. संपूर्ण देशात गाणं इतकं प्रसिद्ध होईल याची अपेक्षा देखील केली नव्हती... आज मला सगळे  'ऊं अंटावा'मुळे ओळखतात....'


जीवनातील एका गोष्टीची खंत व्यक्त करत समंथा म्हणाली, ' 'ऊं अंटावा' गाण्यानंतर सगळे माझ्या सिनेमांना विसरले आहेत... याचं दुःख वाटतं... चाहते मला आता माझ्या सिनेमांमुळे नाही तर  'ऊं अंटावा' गाण्यामुळे ओळखतात... '


साऊथ एक्ट्रेस समंथा रुथ प्रभूने आपल्या अदाकारीची जादू दक्षिणात्य सिनेमावर खूप चालवली आहे. संमथाचे चाहते फक्त दक्षिण भारतातच नाही तर हिंदी दर्शकदेखील आहेत. चाहते तिला नेहमी पडद्यावर पाहण्यासाठी उत्साहित असतात.