Samantha आणि Naga chaitanya पुन्हा येणार एकत्र? चाहत्यांमध्ये आनंद, पण...
समंथा आणि नागा चैतन्य त्यांच्यातील मतभेद दूर करतील आणि पुन्हा...
मुंबई : दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. अभिनेता नागा चैतन्यपासून घटस्फोट घेतल्यानंतर समंथा सतत चर्चेत आहे.
दोघांनी अचानक घटस्फोट घेतल्याने चाहते ही नाराज झाले होते. दोघांचे लग्न जवळपास चार वर्षे टिकले, त्यानंतर त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. ज्याची सुरुवात समंथाने तिच्या सोशल मीडिया हँडलवरून तिच्या पतीचे आडनाव अक्किनेनी काढून टाकल्याने झाली.
समंथा आणि नागा चैतन्य अक्किनेनी नंतर ऑक्टोबर 2021 मध्ये सोशल मीडियावर घटस्फोटाची घोषणा करणारी पोस्ट शेअर केली. आता पुन्हा एकदा समंथा आणि नागा चैतन्य चर्चेत आले आहेत.
खरं तर, अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवरून वेगळे झाल्याची घोषणा करणारी पोस्ट हटवली आहे. तेव्हापासून वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या सोशल मीडियावर फिरत आहेत.
समंथाच्या इन्स्टाग्राम हँडलवरून पोस्ट हटवताच, अनेकांनी ही जोडी पुन्हा एकत्र येत असल्याचा अंदाज लावला. दोघांना पुन्हा एकदा एकत्र बघून लोकांना आनंद झाला. तर दुसरीकडे असे म्हटले आहे की नागा आणि समंथा पुन्हा एकत्र येणार नाहीत.
तिने हे केवळ सोशल मीडिया हँडलवरून संबंधित नसलेल्या पोस्ट काढण्यासाठी केले. त्यामुळे दोघेही एकत्र येणार अशी फक्त अफवा आहे.
अनेकांना आशा होती की समंथा आणि नागा चैतन्य त्यांच्यातील मतभेद दूर करतील आणि पुन्हा एकत्र येतील. पण या अपडेटने पुन्हा एकदा चाहते नाराज झाल्याचं बोललं जात आहे.
समंथा आणि नागा चैतन्य 2014 मध्ये 'ऑटोनगर सूर्या' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जवळ आले होते आणि एकमेकांच्या प्रेमात पडले होते.
त्यानंतर चैतन्यचे वडील नागार्जुन यांनी 2015 मध्ये या दोघांच्या नात्याबद्दल मीडियाला सांगितले. नागा चैतन्य आणि समंथा 6 ऑक्टोबर 2017 रोजी गोव्यात लग्नगाठ बांधले. मात्र लग्नाच्या चार वर्षानंतर दोघेही वेगळे झाले.