मुंबई : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आणि अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) लग्नाच्या 4 वर्षांनंतर विभक्त झाले आहेत. 4 वर्षांनंतर एकमेकांना घटस्फोट देत असल्याची माहिती देत, दोघांनी चाहत्यांना मोठा धक्का दिला. घटस्फोटानंतर त्यांच्या आयुष्यातील अनेक छोट्या मोठ्या गोष्टी समोर आल्या. अनेक चर्चांनंतर पुन्हा एक मोठी बातमी समोर येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घटस्फोटानंतर नागा चैतन्य आणि समंथा पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा रंगत आहे. दोघांना एक मोठा सिनेमा ऑफर झाल्याची बातमी समोर येत आहे.


फिल्म मेकर नंदिनी रेड्डी आपल्या आगामी सिनेमात समंथा आणि नागा चैतन्यला डेट करणार असल्याची चर्चा रंगत आहे. दोघे 2019 साली प्रदर्शित झालेल्या 'ओह बेबी' सिनेमात दिसले. 


आता नंदिनी रेड्डी घटस्फोटानंतर पुन्हा दोघांना सिनेमाच्या माध्यमातून  एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचं समोर येत आहे.  नंदिनी रेड्डी समंथाच्या खूप जवळ असल्याचं टॉलिवूडच्या रिपोर्टमधून समोर आलं आहे. 


त्यामुळे अभिनेत्री नंदिनीला निराश करणार नाही, असा अंदाज वर्तवला जात आहे. या सिनेमाची अधिकृत घोषणा अद्याप व्हायची आहे. घटस्फोटानंतर या जोडप्याला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहतेही आतुर झाले आहेत.