Samantha Ruth Prabhu : आजारपणामुळे संपलं सामंथाचं करिअर?
सोशल मीडियावर कायम एक्टिव्ह असणारी सामंथा येत्या दिवसात मात्र फारशी सोशल मीडियावर एक्टिव्ह नाहिये.
Samantha Ruth Prabhu: सध्या साऊथ फिल्म इंडस्ट्रीचा बोलबाला आहे. साऊथ स्टारही नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. यातलच एक नाव म्हणजे सामंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) सोशल मीडियावर कायम एक्टिव्ह असणारी सामंथा येत्या दिवसात मात्र फारशी सोशल मीडियावर एक्टिव्ह नाहिये. काहि दिवसांपुर्वी सामंथाने एक पोस्ट शेअर करत तिच्या चाहत्यांना धक्का दिला होता. पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने तिला मायोसिटिस ( Myositis ) नावाचा आजार असल्याचं सांगितलं होतं. सध्या अभिनेत्री तिच्या आरोग्यावर फोकस करताना दिसत आहे. अशातच सामंथा कामातून ब्रेक घेणार असल्याचं बोललं जात आहे.
सिनेमातून घेणार ब्रेक
समोर आलेल्या माहितीनुसार सामंथा एकदम ठिक होईपर्यंत अभिनयातून एक मोठा ब्रेक घेणार आहे. एका पेक्षा एक सिनेमा दिल्यानंतर सामंथाकडे येत्या दिवसांत अनेक बड्या सिनेमांच्या ऑफर होत्या मात्र या आजारातून सावरण्यासाठी सामंथाने या सिनेमाच्या निर्मात्यांना फोन करुन या सिनेमातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. यांनंतर या सिनेमाच्या निर्मात्यांनीही तिच्या जागी दुसऱ्या अभिनेत्रींचा शोध घेण्यास सुरुवातही केली आहे.
आजारामुळे अनेक प्रोजेक्ट हातून निघाले
सामंथा लवकरच सिनेमातून ब्रेक घेणार आहे. मात्र त्याआधी ती कुशी सिनेमाचं शूटिंग पुर्ण करणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत विजय देवरकोंडा मुख्य भूमिकेत आहे. सामंथाच्या टीमने हे स्पष्ट केलं आहे की, अभिनेत्रीने बाकीच्या प्रोजेक्टच्या निर्मात्यांना माहिती दिली आहे. या सिनेमांना तिने स्पष्टपणे नकार दिला आहे. या सगळ्यांसाठी गेल्या काही महिन्यांसाठी बोलणं सुरु आहे.
कुशी या सिनेमात विजय देवरकोंडा आणि सामंथा मुख्य भूमिकेत आहेत. हा एक रोमँन्टिक ड्रामा सिनेमा आहे. या सिनेमाचं नाव पहिलं 'वीडि 11' ठेवलं होतं. याचबोरबर हा सिनेमा आधी डिसेंबर २०२२ मध्ये रिलीज होणार होता. मात्र विजयने एका मुलाखतीत स्पष्ट केलं की हा सिनेमा या वर्षी नव्हे तर पुढच्या वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये रिलीज होणार आहे.
दाक्षिणात्य कलाजगत गाजवणारी आणि गेल्या काही काळापासून खासगी आयुष्यासोबतच आजारपणामुळं चर्चेत असणारी अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samatha Ruth Prabhu) येत्या काळात काही महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत दिसत आहे. एकेकडी ती फिल्म इंडस्ट्रीमधून ब्रेक घेणार आहे तर दुसरीकडे असंही म्हटलं जात आहे की, अभिनेत्री मायोसायटिस (Myositis) या आजारामुळं येत्या काही दिवसांत देश सोडणार आहे. ही अभिनेत्री कायमस्वरुपी देश सोडणार नसून आजारपणाच्या उपचारांसाठी ती या निर्णयावर पोहोचली असल्याचं सांगण्यात येत आहे.