कोणाच्याही वाट्याला इतकं दु:ख येऊ नये; समांथाचा `तो` VIDEO पाहून नेटकरी झाले भावूक
Samantha Ruth Prabhu Emotional Video : कुटूंब किती महत्त्वाचं असतं... समांथा रुथ प्रभूचा `तो` व्हिडीओ पाहून नेटकरीही झाले भावूक
Samantha Ruth Prabhu Emotional Video : दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू गेल्या काही दिवसांपासून तिची सीरिज ‘सिटाडेल हनी बनी’ प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या सीरिजच्या प्रमोशन दरम्यान, एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओत समांथाच्या चेहऱ्यावर दु:ख आणि निराशा पाहायला मिळत आहे. खरंतर, या व्हायरल झालेल्या व्हिडीओत वरुन धवन त्याची पत्नी नताशा आणि लेकीविषयी बोलताना दिसत आहे. कुटुंबाविषयी जेव्हा वरुन बोलतो तेव्हा तिच्या चेहऱ्यावर दु:ख आणि निराशा दिसून येते.
'द हॉलीवुड रिपोर्टर' शी बोलत असताना वरुण धवननं सांगितलं की ‘बनी’ च्या भूमिकेला कसं तो रिलेट करतो. वरुण म्हणाला, 'मी बनीच्या भूमिकेला खूप चांगल्या प्रकारे समजतो. खरं सांगायचं झालं तर मी या सीरिजची शूटिंग ही माझी मुलगी लाराच्या जन्माच्या आधी केलं होतं. सीरिजमध्ये कुटुंब नाही म्हणून ‘बनी’ ला खूप वाईट वाटतं असतं, त्याला कुटुंब हवं असतं. मला ही भावना खूप चांगल्या तेव्हा प्रकारे कळली जेव्हा मला फॅमिली स्टार्ट करायची होती.'
वरुण धवननं पुढे सांगितलं की 'मी या काळातून गेलोय जेव्हा नताशा आणि मी फॅमिली स्टार्ट करण्याच्या विचारात होतो. मी विचार करत होतो की मला स्वत: चं कुटुंब पूर्ण करायला हवं. त्यावेळी मी बनीच्या भूमिकेशी जोडलो गेलो आणि मला ती भूमिका माझी असल्याचं वाटू लागलं.'
हेही वाचा : 'बाई... जरा तरी ठेव!' लहान मुलांच्या कार्यक्रमात असले कपडे? ड्रेसिंग सेन्समुळे मलायका अरोरा ट्रोल
वरुण ज्यावेळी या प्रश्नाचं उत्तर देत होता तेव्हा समांथाच्या चेहऱ्यावर दु:ख दिसून आलं. कुटुंबाविषयी त्याचं बोलणं ऐकूण तिला खूप वाईट वाटू लागल्याच दिसत होतं. या व्हिडीओवर कमेंट करत असताना एक नेटकरी म्हणाला, 'समांथाला पाहून असं वाटतं की तिला मोठ्यानं ओरडायचं आहे आणि रडायला येतय.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'कोणीही असं दु:खं कधी अनुभवायला नको.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'लवकरच समांथाच्या आयुष्यात अशी कोणी व्यक्ती येईल जी तिच्या आयुष्यात प्रेम आणि आनंद घेऊन येईल.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'तिचं देखील हे स्वप्न असेल आणि तिला देखील स्वत: चं कुटुंब सुरु करायचं असेल पण तिचं स्वप्न मोडलं.'