Malaika Arora Gets Troll Over Viral Video : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असल्याचं आपण पाहतो. सध्या तिचा एका कार्यक्रमातील व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्या कार्यक्रमात तिनं परिधान केलेल्या कपड्यांमुळे तिला ट्रोल करण्यात आलं आहे.
मलायका अरोराचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीचा आहे. हा कार्यक्रम मिस्टर बिस्ट या ब्रॅंडचा होता. मुंबईत असलेल्या या कार्यक्रमात सगळ्या बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्यात करीना कपूर खान, सैफ अली खान, शिल्पा शेट्टी आणि रितेश देशमुख आणि त्यांची मुलं देखील दिसले. या कार्यक्रमात मलायकानं देखील हजेरी लावली. त्यावेळी तिच्यासोबत मुलगा अरहान खान देखील आला आहे.
मलायकानं यावेळी डेनिम को-ऑर्ड सेट परिधान केला आहे. तिचा या कार्यक्रमातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. मलायकाच्या या व्हिडीओला पाहून नेटकऱ्यांनी त्यावर विविध कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, 'मुलांसोबत आहेस याचं तर भान ठेव. अशावेळी कसे कपडे परिधान करायचे हे खरंच कळायला हवं.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'मला तिचे कपडे आवडले नाही.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'कमीत कमी मुलगासोबत असताना नीट कपडे परिधान कर.' आणखी एक नेटकरी म्हणाला, लहाण मुलं आहेत तिथे देखील तुला असं का राहायचं आहे?
या कार्यक्रमातील अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. मलायका यावेळी तिची मैत्रिण करीना कपूरला देखील भेटली. करीनानं या कार्यक्रमात काळ्या रंगाचं टी-शर्ट आणि डेनिम जीन्स परिधान केली होती. तर नेटकऱ्यांनी यावरून मलयकाला ट्रोल केलं आहे की करीनानं कसे कपडे परिधान केले आणि तू कसे कपडे परिधान केले. दरम्यान, या कार्यक्रमातील एक व्हिडीओ हा करीना आणि सैफचा मुलगा जेहचा देखील आहे. यात जेह हा सैफचं लक्ष नसताना गुपचूप टेबलवरील चॉकलेट उचलताना दिसतोय.
हेही वाचा : VIDEO : 'अब्बांचं लक्ष नाही, चला चॉकलेट्स उचलूयात' जेह आणि सैफच्या Video वर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट
दरम्यान, मलायकानं काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिनं मुलगा अरहानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती.
LIVE|
WI
(10 ov) 32/2 (75 ov) 205
|
VS |
NZ
278/9(74.4 ov)
|
| Full Scorecard → | ||
|
SA
(20 ov) 213/4
|
VS |
IND
162(19.1 ov)
|
| South Africa beat India by 51 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
PHI
(20 ov) 182/5
|
VS |
INA
104(18.5 ov)
|
| Philippines beat Indonesia by 78 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
SIN
(20 ov) 156/8
|
VS |
THA
152/9(20 ov)
|
| Singapore beat Thailand by 4 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.