Samantha Ruth Prabhu Health : दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) गेल्या काही दिवसांपासून तिचा आगामी चित्रपट 'शाकुंतलम' (Shaakuntalam) मुळे चर्चेत आहे. समंथा सतत चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसत आहे. दरम्यान, प्रमोशनवेळी समंथाला तिच्या गंभीर आजारामुळे अनेक त्रास झाले. तिला पापाराझींच्या फ्लश लाईटचा त्रास झाला होता. कितीही काही झालं तरी समंथा ही चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसते. दरम्यान, आता शकुंतलम चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान समंथाची तब्येत पुन्हा खालावली आहे. तिला ताप आला असून तिचा आवाजही गेला आहे. याविषयी समंथानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समंथाने तिच्या ट्विटरवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये समंथानं लिहिलं की, 'माझ्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी आणि तुमचे प्रेम मिळविण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. दुर्दैवाने, व्यस्त वेळापत्रक आणि प्रमोशनचा माझ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे माझी तब्येत बिघडली असून मला ताप आला आहे आणि माझा आवाज गेला आहे.' 



समंथाचं हे ट्वीट पाहिल्यानंतर तिच्या चाहत्यांनी त्यावर कमेंट करण्यास सुरुवात केली आहे. समंथाची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत असल्याचं त्यांनी कमेंट करत सांगितले. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'आम्ही तुम्हाला सपोर्ट करायला सदैव तयार आहोत. तुझ्यावर प्रेम आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला,'तुझा चित्रपट हिट होईल, फक्त तुझ्या फिटनेसची काळजी घे.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'लवकर बरे व्हा मॅडम. आमच्या प्रार्थना आणि प्रेम तुमच्या पाठीशी आहे.' 


समंथाच्या 'शाकुंतलम' या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर. हा चित्रपट कालिदास यांच्या प्रसिद्ध नाटक शाकुंतलावर आधारित आहे. तर ही एक पौराणिक कथा आहे. 'शाकुंतलम' हा चित्रपट आज 14 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. तर या चित्रपटाशिवाय समंथा ही विजय देवरकोंडासोबत 'कुशी' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. 


हेही वाचा : Prajakta Mali च्या लग्नाच्या चर्चांवर Vaibhav Tatwawadi चं उत्तर म्हणाला, 'मला प्राजक्ताने स्वत: ...'


समंथाला कोणता आजार झाला होता? समंथाला मायोसिटिस नावाचा ऑटोइम्यून आजार आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिनं खुलासा केला होता. त्यावेळी तिनं सांगितलं होतं की त्यातून बाहेर पडल्यानंतर पोस्ट शेअर करत ती याविषयी सांगणार होती पण त्याला खूप वेळ लागत असून तिनं आधीच त्या विषयी सांगितलं. दरम्यान, अजूनही समंथा त्या सगळ्याचा सामना करत आहे. सततच्या दगदगीचा आणि बिझी शेड्यूलचा तिच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.