मुंबई : दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू (samantha ruth prabhu) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. समांथा ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. समांथाला मायोसिटिस या आजाराचं निदान झालं. नुकताच तिचा आगामी चित्रपट 'यशोदा' चा ट्रेलर प्रदर्शित झाला. या निमित्तानं सगळ्यांचे आभार मानत समांथानं एक पोस्ट शेअर करत सगळ्यांचे आभार मानले आहे. (samantha ruth prabhu in diagnosed with autoimmune condition myositis) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समांथानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. यावेळी समांथा ही स्टुडीओमध्ये असून तिनं ड्रिप लावल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करत 'यशोधा ट्रेलरला तुम्ही जबरदस्त प्रतिसाद दिला. हे प्रेम आणि कनेक्शन मी तुम्हा सर्वांसोबत शेअर करत आहे. आयुष्यानं माझ्यावर लादलेल्या न संपणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्याचे सामर्थ्य मला तुमच्याकडूनच मिळते. काही महिन्यांपूर्वी मला Myositis नावाच्या आजाराचे निदान झाले होते. आजारावर लवकर मात करेन आणि तुमच्यासोबत ही बातमी शेअर करेन असं मला वाटलं होतं. पण त्याला थोडा वेळ लागत आहे.  मला हळुहळू कळलं की आपल्याला नेहमीच आपण खूप स्ट्रॉंग आहोत हे दाखवण्यात अर्थ नाही.' (samantha ruth prabhu instagram post) 



पुढे समांथा म्हणाली, मी अजूनही संघर्ष करत आहे. डॉक्टरांना खात्री आहे की मी लवकरच पूर्ण बरी होईन. मी चांगलं आणि वाईट दिवस पाहिले आहेत.... शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या.... आणि असे वाटत असतानाही मी करू शकेन. यातील आणखी एक दिवस सहन करू शकत नाही, कसा तरी हा क्षण निघून जाईल. मला वाटतं की याचा अर्थ असा होऊ शकतो की मी आणखी एक दिवस बरं होण्याच्या जवळ आहे. माझं तुमच्यावर प्रेम आहे..' (samantha ruth prabhu in diagnosed with autoimmune condition myositis wrote this too shall pass) 


गौतम वासुदेव मेनन दिग्दर्शित, 2010 मध्ये रिलीज झालेल्या 'ये माया चेसावे' या चित्रपटातून समांथानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. चित्रपटानं तिला सर्वोत्कृष्ट महिला डेब्यू, फिल्मफेअर पुरस्कार आणि नंदी पुरस्कार मिळवून दिला. 11 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार्‍या 'यशोदा' मध्ये दिसणार आहे. चित्रपट निर्माते हरी शंकर आणि हरीश नारायण यांनी लिखित आणि दिग्दर्शित केलेला, अॅक्शन थ्रिलर पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तेलगू, तामिळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. समांथासोबत वरलक्ष्मी सरथकुमार, उन्नी मुकुंदन, राव रमेश, मुरली शर्मा, संपत राज, शत्रु, मधुरिमा, कल्पिका गणेश, दिव्या श्रीपदा, प्रियांका शर्मा आणि इतर कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.