अभिनेत्री सामंथाच्या चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी; एलर्जीमुळे शरीरावर तयार झाल्या जखमा
`ओ अंतावा` या गाण्यातून चाहत्यांच्या मनावर गारुड घालणारी अभिनेत्री सध्या शाकुंतलम या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये अभिनेत्री सध्या व्यस्त आहे. मात्र आता तुमच्यासाठी एक चिंता वाढवणारी बातमी आहे. जी ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.
मुंबई : अभिनेत्री सामंथा शाकुंतलम हा चित्रपट आज म्हणजेच 14 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला आहे. हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये 2D आणि 3D मध्ये पाहता येईल. अल्लू अर्जुनची मुलगी अरहा देखील या चित्रपटातून बालकलाकार म्हणून पदार्पण करत आहे.
'ओ अंतावा' या गाण्यातून चाहत्यांच्या मनावर गारुड घालणारी अभिनेत्री सध्या शाकुंतलम या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये अभिनेत्री सध्या व्यस्त आहे. या सिनेमाच्या शुटिंग दरम्यान तिने अनेक अडचणींचा सामना केला होता. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत सामंथाने तिच्या चाहत्यांसोबत तिने कोणत्या कोणत्या गोष्टींचा सामना केला याबाबत सांगितलं आहे. या चित्रपटाचं शूटिंग तिच्यासाठी सोपं नव्हतं. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिने 5 आव्हानांचा सामना केला आहे याबद्दल सांगितलं आहे.
अशी चॅलेंज घेत सामंथाने केलं शूटिंग पुर्ण
शकुंतलम चित्रपटाच्या सेटवर समांथाला चावला होता. असं तिने या व्हिडिओत सांगितलं आहे.
झोपेतही सामंथा या चित्रपटातील डायलॉग्स ऐकायची कारण तिला या सिनेमासाठी हिंदी, तमिळ आणि तेलुगू या तीन वेगवेगळ्या भाषांमध्ये डब करायचं होतं, जे तिला खूप कठीण वाटायचं.
या सिनेमासाठी डिझायनर नीता लुल्ला यांनी कपडे डिझाइन केले आहेत. विशेषत: एका गाण्यात सामंथाने 30 किलो वजनाचा लेहेंगा घातला होता. जेव्हा ती ३० किलोचा लेहेंगा घालून शूट करायची तेव्हा ती कॅमेऱ्याच्या चौकटीतून बाहेर पडायची, त्यामुळे तिला एक सीन करण्यासाठी 16-17 टेक घ्यावे लागायचे.
समंथाला फुलांची अॅलर्जी आहे. मात्र या चित्रपटासाठी तिला फुलांचे दागिने घालावे लागले. त्यामुळे जेव्हा ती जेव्हा ते दागिने घालायची तेव्हा तिला त्या ठिकाणी अॅलर्जी यायची. याचा परिणाम असा झाला की सामंथाच्या शरीरावरच्या एलरर्जीमुळे जखम तयार झाल्या. तिने तिच्या जखमा मेकअपने झाकल्या. ६ महिन्यांनंतर तिची जखमा बऱ्या झाल्या.
या सिनेमात दिसणारे तिचे केस खर नव्हेत. या सिनेमासाठी तिने बनावट केस वापरले आहेत.