Samantha Ruth Prabhu : दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. समांथा सतत सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. समांथानं सध्या तिच्या कामातून ब्रेक घेतला असून आता ती तिच्या आरोग्यावर लक्ष देणार आहे. तर लवकर तिच्या आरोग्यावर उपचार करण्यासाठी ती अमेरिकेत जाणार असल्याची माहिती देखील समोर आली होती. तर त्यासोबत आता अशी बातमी समोर येत आहे की समांथानं तिच्या मायोसाइटिस या आजारावर उपचार करण्यासाठी एका कलाकाराकडून तब्बल 25 कोटी रुपये घेतले. त्यावर आता समांथानं तिची प्रतिक्रिया दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसांपासून अशा चर्चा सुरु होत्या की समंथानं तिच्या आरोग्यावर लक्ष देण्यासाठी पटपट काही प्रोजेक्ट्सचं शूटिंग संपवलं तर काही चित्रपटांना नकार दिला. या सहा महिन्यांच्या काळात समांथा कोणताही हिंदी किंवा तमिळ प्रोजेक्ट साइन करणार नाही आहे. इतकंच नाही तर समांथानं ज्या निर्मात्यांकडून चित्रपटांसाठी आगाऊ बुकिंगसाठी पैसे आधी दिले होती. त्यांचे पैसे परत केले आहेत. 



मीडिया रिपोर्ट्सनुसार, समांथा ही तिच्या आजारावर उपचार करण्यासाठी अमेरिकेत जाणार आहे. तर त्यासाठी तिनं एका तेलगू चित्रपटसृष्टीतील एका लोकप्रिय अभिनेत्याकडून 25 कोटी घेतेले. त्या अभिनेत्याचं नाव यावेळी सांगितले नाही. आता समांथानं यावर तिची प्रतिक्रिया दिली आहे. समांथानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून या बातमीवर प्रतिक्रिया दिली आहे. समांथा यावेळी म्हणाली की 'मायोसाइटिस या आजाराच्या उपचारासाठी 25 कोटी? तुम्हाला कोणीतरी चुकीची माहिती दिली आहे. मला या गोष्टीचं एक बरं वाटतं आहे की मला उपचारासाठी या रक्कमेतील खूप कमी रक्कम लागणार आहे. इतकंच नाही तर, माझ्या करिअरमध्ये मी जे काही काम केलं आहे त्या सगळ्या कामासाठी मला व्यवस्थीत मोबदला मिळाला आहे. त्यामुळे माझ्यासाठी लागणारा जितका खर्च आहे तो मी करू शकते. धन्यवाद', असं समंथा म्हणाली आहे. 



पुढे मायोसाइटिस या आजाराविषयी बोलत समांथा म्हणाली, 'मायोसाइटिस हा असा एक आजार आहे ज्याचे निदान हजोराच्या संख्येत लोकांना होते. त्याच्या विषयी काहीही बोलण्याआधी कृपया त्याविषयी थोडी माहिती आपण जाणून घ्यायला हवी.'


हेही वाचा : नवऱ्यासोबत बालीत रोमॅंटिक झाली कार्तिकी गायकवाड, फोटो एकदा पाहाच!


समांथाला शाकुंतलम या चित्रपटाचं शूटिंग करत असतानाच मायोसाइटिस या आजाराचे निदान झाले होते. तिनं या चित्रपटाच्या डबिंगचं काम आजारात असतानाच केलं. त्यावेळी समांथानं स्टुडिओमधील तिचा एक फोटो देखील शेअर केला होता. दरम्यान, तेव्हा समांथानं ब्रेक घेतला नाही. तर त्यानंतर तिनं लगेच विजय देवरकोंडासोबतच्या चित्रपटाचं शूटिंग संपवलं आणि आता तिनं एक मोठा ब्रेक घेतला आहे.