4 वेळा IVF केल्याने अभिनेत्री ट्रोल, इंजेक्शन घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
41 वर्षीय अभिनेत्री संभावना सेठ आता चित्रपट आणि टेलिव्हिजनपेक्षा सोशल मीडियावर जास्त सक्रिय आहे.
मुंबई : 41 वर्षीय अभिनेत्री संभावना सेठ आता चित्रपट आणि टेलिव्हिजनपेक्षा सोशल मीडियावर जास्त सक्रिय आहे. संभावनाचे ब्लॉग सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहेत आणि ती प्रत्येक लहान-मोठी गोष्ट तिच्या चाहत्यांशी शेअर करते. पण अलीकडेच संभावना सेठने तिच्या आयव्हीएफ उपचाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यासोबतच तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही मोठा खुलासा केला आहे. यासोबतच ट्रोल करणाऱ्यांना तिने व्हिडिओ पोस्ट करून सडेतोड उत्तर दिलं आहे.
4 वेळा केलं आहे IVF
संभावना सेठने यूट्यूबवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये अभिनेत्री पती अविनाशसोबत दिसत आहे. व्हिडिओमध्ये अविनाश आणि संभावना यांनी सांगितलं आहे की, दोघंही 3 वर्षांपासून मुलाची योजना करत आहेत. 4 वेळा IVF केलं गेलं असलं तरी चारही IVF अयशस्वी झाले.
लोकं करतात वाईट कमेंट
अविनाश द्विवेदी म्हणाला की, व्हिडीओ पाहून अनेकवेळा लोकं तिच्या फिगरवर कमेंट करतात. कुत्र्यांना किती दिवस खायला घालणार, स्वतः कधी करणार, असंही अनेकजण लिहितात. बॉडी शेमिंगचाही सामना करावा लागतो. हा व्हिडीओ फक्त शेअर करा जेणेकरून तुम्हाला सत्य कळेल. आशा आहे की या व्हिडिओनंतर तुम्ही ट्रोल करणार नाही.
पुन्हा एकदा ट्राय करतेय IVF
व्हिडिओमध्ये अविनाश द्विवेदी आणि संभावना यांनी चाहत्यांना सांगितलं की 4 वेळा IVF अयशस्वी झाल्यानंतर आता ते 5व्यांदा IVF चा प्रयत्न करत आहेत. यासोबतच ही प्रक्रिया किती वेदनादायी आहे हे अभिनेत्रीने सांगितलं. IVF उपचारामुळे अभिनेत्रीने अनेक इंजेक्शन्स देखील दाखवली. जी डॉक्टरांनी तिला लागू करण्यासाठी दिली आहेत. व्हिडिओमध्ये अभिनेत्रीने सांगितलं की, तिला आता हे इंजेक्शन अविनाशच देतो. यासोबतच अभिनेत्रीने इंजेक्शन घेत असताना एक व्हिडिओही शूट केला आहे.