स्किटमुळे Sameer Choughule अडकला अडचणीत, पत्रकार परिषद घेत म्हणाला...
Sameer Choughule Maharashtrachi Hasyajatra : समीर चौघुले `महाराष्ट्राची हास्यजत्रा` या कार्यक्रमात केलेल्या एका स्किटमुळे अडचणीत अडकला आहे. या कार्यक्रमातील क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रेक्षकांनी त्यावर आक्षेप व्यक्त केल्यानंतर पत्रकार परिषद घेत माफी मागितली आहे.
Sameer Choughule Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या मालिकेती कलाकांनी प्रेक्षकांनी मने जिंकली आहेत. या कलाकारांपैकी एक म्हणजे समीर चौगुले. समीर चौघुलेचे स्किट तर लोक परत परत पाहतात. त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांनाजणू वेड लावतं आहे. पण नेहमीच सगळ्यांना त्यांच्या स्किटनं हसवणाऱ्या समीर चौघुलेला त्याच्यात एका स्किटनं अडचणीत आणलं आहे. सगळ्यांचं मनोरंजन करणारा समीर आता अडचणीत अडकला आहे. समीरनं प्रेक्षकां समोर सादर केलेल्या एका स्किटवर एका समाजाच्या लोकांनी आक्षेप घेतला असून त्याला सगळ्यांसमोर माफी मागावी लागली आहे.
समीरनं हास्यजत्रेत एक स्किट सादर केलं होतं. या स्किटमध्ये त्यानं तारपा डान्स सादर केला होता. पण हास्यजत्रा म्हटल्यावर आपण काय अपेक्षा करतो की ते जसं असेल तसं नाही तर त्यात काही तरी ट्विस्ट असेल. त्याचप्रमाणे समीरनं तारपा डान्स हा एका विनोदी पद्धतीनं सादर केला. हा 30 सेकंदाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर अनेकांनी समीरचा विरोध केला आहे. इतकंच काय तर एका ठरावीक समाजानं त्याचा आक्षेप केला. हे पाहता समीरनं एक पत्रकार परिषद घेत जाहीरपणे सगळ्यांची माफी मागितली आहे.
पत्रकार परिषदेत काय म्हणाला समीर चौगुले?
या व्हिडीओत समीर, म्हणाला "काही दिवसांपूर्वी मी एक स्किट सादर केलं होतं. त्या स्किटमधील 30 सेकंदाची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यात मी तारपा डान्स सादर करतोय असं म्हणालो होतो. तारपा नृत्य मी सादर केलं. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की यामुळे माझ्या आदिवासी बंधू व भगिनींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणात मी सगळ्यात आधी मनापासून दिलगिरी व्यक्त करतोय. माफी मागतो आणि हा प्रकार पुन्हा होणार नाही याची तुम्हाला ग्वाही देतो. हा प्रकार अनावधानाने झाला होता. कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू कधीच नसतो. हा हेतू भविष्यातही नसेल असं म्हणतं त्यानं सगळ्यांची माफी मागितली". समीरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
हेही वाचा : ...अन् Ayushmann -अपारशक्तिनं आईचा हात धरुन तिला दिल्लीवरुन मुंबईत आणलं; दोघांवर होतोय कौतुकाचा वर्षाव
महाराष्ट्रची हास्यजत्रा या कॉमेडी कार्यक्रमातील सगळेच कलाकार हे त्यांच्या उत्तम अभिनयासाठी आणि कॉमेडी टाईमिंगसाठी ओळखले जातात. या कार्यक्रमातील स्किट हे नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होताना आपण पाहतो. त्यांच्या स्किटवर आता परदेशातील लोक देखील रील बनवताना दिसतात. अशात आता त्यांची लोकप्रियता किती आहे हे सगळ्यांना ठावूक आहे.