Ayushmann Khurrana With Family: बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना आणि अपारशक्ति खुराना हे दोघे अभिनेते त्यांच्या वडिलांच्या वडिलांच्या निधनानंतर दुःखातून जात आहेत. गेल्या महिन्यात त्याच्या वडिलांचे निधन झाले. तेव्हापासून त्यांचे कुटुंब यातून बाहेर आलेले नाही. 19 मे रोजी आयुष्मान खुराना आणि अपारशक्ति खुराना यांनी त्यांच्या वडिलांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार केले. दरम्यान, वडिलांच्या निधनानंतर आयुष्मान खुराना आणि अपारशक्ति खुराना हे दोघं त्यांच्या आईसोबत मुंबई विमानतळावर दिसले.
आयुष्मान खुराना आणि अपारशक्ति खुराना या दोघांना सोमवारी रात्री त्यांच्या आईसोबत मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आले. यावेळी आयुष्माननं लाइट ग्रीन रंगाचा टी-शर्ट आणि काळ्या रंगाची कार्गो परिधान केली आहे. तर अपारशक्ति खुरानानं निळ्या रंगाचं टी-शर्ट आणि जॅकेट म्हणून पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि टी-शर्टला मॅचिंग निळ्या रंगाची ट्रॅकपॅन्ट परिधान केली आहे. तर त्यांच्या आईनं काळ्या रंगाची कुर्ती परिधान केली आहे. आयुष्मान आणि अपारशक्ति या दोघांनी त्यांच्या आईचा हाथ पकडला आहे. तर त्यांना सांभाळत ते घेऊन जात आहेत.
आयुष्मान खुराना आणि अपारशक्ति खुराना यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी कमेंट करत, म्हणाला त्या दोघांना देवाचा आशीर्वाद मिळू देत. दुसरा नेटकरी म्हणाला, मुलं असावी तर अशी. तिसरा नेटकरी म्हणाला, आईसाठी असलेली काळजी पाहून खूप बरं वाटले.
काही दिवसांपूर्वी आयुष्माननं त्याच्या वडिलांसाठी एक भावुक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये आयुष्मान त्याच्या आईच्या जबाबदारीविषयी बोलला. ही पोस्ट शेअर करत आयुष्माननं कॅप्शन दिलं की आईची काळजी घ्यायची आहे आणि कायम तिच्यासोबत रहायचं आहे. वडिलांसारखं होण्यासाठी त्यांच्यापासून खूप लांब जावं लागतं. पहिल्यांदा असं जाणवतं आहे की वडील खूप लांब आहेत आणि खूप जवळपण आहेत. धन्यवाद बाबा. तुम्ही ज्या प्रकारे आम्हाला मोठं केलं, जितकं प्रेम दिलं आणि तुमचा सेन्स ऑफ ह्यूमर आणि इतक्या सुंदर आठवणी देण्यासाठी धन्यवाद.
हेही वाचा : लग्नासाठी Dattu More च्या सासऱ्यांचा होता विरोध...; अभिनेत्यानं असं जिंकलं त्याचं मन
आयुष्मानचे वडील पी खुराना हे एक लोकप्रिय ज्योतिषी होते. त्यांनी जवळपास 34 पुस्तकं लिहिली आहेत. त्यांच्या क्षेत्राचे त्यांना खूप माहिती होती. 19 मे 2023 रोजी त्यांचे निधन झाले. तर पी खुराना हृदयाच्या समस्येनं त्रस्त होते. त्यांच्यावर मोहालीच्या रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारा दरम्यान, त्यांचे निधन झाले.