मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर देशभरात या प्रकरणाची चर्चा रंगली. 2 ऑक्टोबर 2021 रोजी मुंबईत एनसीबीने एका क्रूझवर हाय-प्रोफाइल पार्टीवर छापा टाकला होता. यात आर्यन खानसह 20 लोकांना अटक केली. सुमारे तीन आठवडे तुरुंगात राहिल्यानंतर आर्यन याची जामिनावर सुटका झाली. समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या नेतृत्वात हा छापा टाकण्यात आला होता. त्यावेळी समीर वानखेडे मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर होते


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याचबरोबर अनेक बॉलिवूड कलाकारांची ड्रग्ज प्रकरणात कसून चौकशी करणारे सनदी अधिकारी समीर वानखेडे कायमच चर्चेत असतात. नुकतेच समिर वानखेडे झी मराठीचा प्रसिद्ध शो खुपते तिथे गुप्तेमध्ये हजेरी लावली होती. यावेळी  या शोचे सुत्रसंचालक अवधूत गुप्ते यांनी समीर यांना प्रश्न विचारला की, 'सेलिब्रिटींना विमानतळावर सगळ्यात जास्त भिती वाटायची ती समिर वानखेडे या नावाची, खूप लोक म्हणायचे वानखेडे मुद्दामून सेलिब्रिटींची जास्त चौकशी करायला लावतात?'  यावर समिर वानखेडे म्हणाले, 'माझ्यासाठी सेलिब्रिटी म्हटल्यावर बाबा आमटे, सिंधूताई सपकाळ, ए.पी.जे अब्दूल कलाम! एअरपोर्टवर असताना जवळपास साडेतीन हजार केसेस केल्या. त्यापैकी तुमच्या भाषेत जे सेलिब्रिटीवैगरे म्हणतात ते किती असतील पन्नास शंभर दिडशे? बाकिचे लोकं कोण आहेत? बाकीचे लोक हे हार्डकोर क्रिमिनल्स ड्यूटी एविडर्स, ड्रग्ज पेडलर्स त्यांच्याबद्दल कोण काही सांगत नाही.'


झी मराठीने त्यांच्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला आहे. एअरपोर्टवर सेलिब्रिटींची वानखेडे मुद्दाम जास्त तपासणी करतात. 'खुपते तिथे गुप्ते', ६ ऑगस्ट, रविवार, रात्री 9 वाजता. असं कॅप्शन देण्यात आलंय. मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर यांचे ते पती आहेत. क्रांतीने मराठी सिनेसृष्टीला एका पेक्षा एक सिनेमा दिले आहेत. अनेकदा क्रांती तिच्या सोशल मीडियावर समिर यांच्यासोबत फोटो व्हिडिओ शेअर करत असते. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


समिर वानखेडे यांचं कार्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरण खूप गाजलं. याचबरोबर सुशांत सिंह राजपूत प्रकरणही त्यांचं खूप चर्चेत होतं. अनेक नामवंत सेलिब्रिटींची ड्रग्ज प्रकरणात त्यांनी चौकशी केली आहे.  याचबरोबर कार्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणी माजी प्रादेशिक संचालक समीर वानखेडे हे अडचणीत आले होते. NCB चे माजी प्रादेशिक संचालक शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्स प्रकरणात जाणीवपूर्वक फसवल्याबद्दल आणि त्याच्याकडून 25 कोटींची लाच मागितल्याप्रकरणी चौकशी सुरू आहे. यापूर्वी वानखेडे सीबीआयसमोर चौकशीसाठी हजर झाले होते.