समीर यांची पत्नी अभिनेत्री क्रांती म्हणाली, ``आम्ही असं केलं असतं तर कधीच.....``
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करणारे एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची सध्या जोरदार चर्चा आहे.
मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करणारे एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची सध्या जोरदार चर्चा आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आता वादाच्या भोवऱ्यात फसल्याचं दिसत आहेत. राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी, एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत.
समीर यांच्या नेतृत्वाखाली ड्रग्ज प्रकरणात सातत्याने कारवाई करण्यात आली आहे. त्यांची पत्नी क्रांती रेडकर वानखेडे, समीर वानखेडे यांच्यावर झालेल्या आरोपांच्या विरोधात समीर यांच्या समर्थनासाठी पुढे आली आहे.
नवाब मलिक यांनी केले गंभीर आरोप
यावर समीरच्या पत्नीने ट्विट करत स्पष्टीकरण दिलं आहे. 'मी आणि माझा नवरा समीर दोघंही जन्माने हिंदू आहोत. आम्ही कधीही धर्मांतर केलं नाही. आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो.
समीरचे वडील देखील हिंदू आहेत आणि त्यांनी माझ्या मुस्लिम सासूशी लग्न केले, त्या आता या जगात नाहीत. समीरचे आधीचं लग्न स्पेशल मॅरेज अॅक्टनुसार झालं होतं. 2016 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. आमचं लग्न 2017 मध्ये हिंदू विवाह कायद्यांतर्गत नोंदणीकृत झालं आहे.
क्रांतीने व्यक्त केलं आपलं मत
क्रांती रेडकर वानखेडेने झी न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये पती समीर वानखेडे यांची बाजू मांडली आहे. मुलाखतीमध्ये बोलताना क्रांती म्हणाली की, त्यांना त्यांचं काम करु द्या, ते देशसेवा करत आहेत, तर प्लिज त्यांना त्यांचं काम करु द्या. यामुळे त्यांचा वेळ वाया जातोय.
याचबरोबर मुलाखतीमध्ये तिला पढे विचारण्यात आलेला प्रश्न मालदिवला तुम्ही फिरायला गेला होते का? आणि यावेळी तुमच्यासोबत कुणी बॉलिवूड स्टार्स होते का? याला प्रत्युत्तर देत क्रांती म्हणाली की, आम्ही कुणासोबत गेलो नाही, हे सगळे आरोप खोटे आहेत. मी माझी मुलं आणि पती समीर मालदिवला गेलो होतो. यावेळी आम्ही आमच्या कष्टाने कमवलेल्या पैशांनी ही टूर केली.
याचबरोबर क्रांतीला समीर यांनी खंडणी घेतल्याच्या आरोपावर प्रश्न विचारला असता यावर क्रांती उत्तर देत म्हणाली, आम्ही खूप सर्वसामान्य कुटूंबातून आहोत. आम्ही आमचा खर्च आमच्या सेव्हिंगच्या पैशातून करतो. समीर यांना यातून पैसे कमवायचे असते, तर आम्ही कधीच केलं असतं.
आम्ही खूपचं साधी माणसं आहोत आणि आमच्या खूप छोट्या अपेक्षा आहेत. जेव्हा समीर यांना अशा ऑफर येतात, तेव्हा समीर अशा लोकांना समोर उभं देखील करत नाहीत. असं म्हणत मी समीर यांच्या पाठिशी कायम खंबीरपणे उभी आहे, अशी प्रतिक्रिया क्रांतीने झी न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिली.