मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री तिच्या गरोदरपणामुळे चांगलीच चर्चेत होती. तिच्या आयुष्यात एका गोंडस मुलीचे आगमन झाले आहे. १२ जुलैला समीरा आणि अक्षयला कन्यारत्नाचा लाभ झालाय. तिने तिच्या मुलीचे नाव नायरा असे ठेवले आहे. एका अनोख्या अंदाजात तिने तिच्या मुलीचे नाव ठेवले आहे. गेल्या दिवसांपासून चाहते तिच्याकडे मुलीचा एक फोटो पोस्ट करण्याची इच्छा व्यक्त करत होते. तेव्हा तिने चाहत्यांना नाराज न करता नायराचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. 




COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समीराने तिच्या गरोदरपणातील संपूर्ण काळ एन्जॉय केला. तिने केलेले फोटोशूटही ती चाहत्यांसोबत शेअर करत होती. गरोदरपणातही समीरा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह होती. समीराने तिच्या ९व्या महिन्यातील बेबी बंम्पसोबत अंडरवॉटर फोटोशूट केले होते.


समीरा आणि तिचा पती अक्षय वर्दे यांना याआधी एक 'हंस' नावाचा मुलगा आहे. समीरा आणि अक्षय २०१४ मध्ये लग्नबंधनात अडकले होते.