मुंबई : 'जय हो' (Jai Ho) आणि 'टॉयलेट एक प्रेम कथा' (Toilet: Ek Prem Katha) यांसरख्या चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या सना खानच्या यशाचा ग्राफ उंच जात असताना तिने कलाविश्वातून काढता पाय घेतला. ग्लॅमर आणि झगमगत्या दुनियेला राम राम करत तिने गुजरातच्या एका मौलानासोबत निकाह केला. तेव्हापासून ती  इंडस्ट्रीपासून दूर आहे. कधी बॉलिवूडची हॉट आणि ग्लॅमरस असलेली सना आता पूर्णपणे इस्लामी रंगात रंगली आहे. एवढंच नाही तर ती अनेक सभांना देखील हजेरी लावते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सभामध्ये जावून सना आपल्या आयुष्याबद्दल इतर महिलांना सांगताना दिसत आहे. सना म्हणते पैसा-प्रसिद्धी  सर्व गोष्टींना मागे टाकत मी एका चांगल्या आयुष्याची निवड केली आहे. निकाहनंतर आता पुन्हा सना चर्चेत आली आहे. सध्या सनाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये सना पतीबद्दल एक खास  वक्यव्य करताना दिसत आहे. 



एक दिवस असा होता जेव्हा सनाचा पती तिला बहिन या नात्याने हाक मारायचा. सना म्हणते, 'पूर्वी आम्ही मौलानाला बघायचो आणि आम्ही पळून जायचो कारण आम्हाला वाटलं की तो आपल्याला जहन्नुममध्ये पाठवणार. 2018ची गोष्ट आहे जेव्हा अनस मला बहिन म्हणून हाक मारायचा.' सध्या सनाचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. 


सनाच्या करियरबद्दल बोलायचं झालं तर , तीने 2005 साली प्रदर्शित झालेल्या 'यही है हाय सोसायटी' (Yehi Hai High Society) चित्रपटाच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर ती 2019 साली 'अयोग्य' चित्रपटानंतर कलाविश्वाचा निरोप घेतला. एवढंच नाही तर तिने अभिनेता सलमान खान होस्ट करत असलेल्या 'बिग बॉस' शोमध्ये देखील भाग घेतला.