मुंबई :  संजू या सिनेमाच्या ट्रेलर नंतर पुन्हा एकदा संजय दत्तचं आयुष्य चर्चेत आलं आहे. या निमित्ताने संजय दत्त त्याची पहिली पत्नी रिचा शर्मा आणि मुलगी त्रिशाला दत्त याचा विषय निघाला. संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्त सध्या सुट्टी एन्जॉय करत आहे. त्रिशाला बारबाडोस याठिकाणी हॉलिडे सेलिब्रेट करीत असून, तेथील काही फोटोही तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोत त्रिशालाचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्रिशाला कॅरेबियन आयलॅण्ड येथील बीचवरील तिच्या हटके अंदाजात दिसत आहे.  त्यामध्ये ती चांगलीच एन्जॉय करताना दिसत आहे. त्रिशाला नेहमीच तिच्या बोल्ड लूक आणि फॅशनवरून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चर्चेत असते. वास्तविक त्रिशाला खूपच स्टायलिश असून, तिच्या अदा नेहमीच फोटोच्या माध्यमातून बघावयास मिळतात. त्रिशालाला अ‍ॅडव्हेंचर खूप पसंत आहे. ज्याचा ती बारबाडोस येथे आनंद घेताना दिसत आहे. 






दरम्यान, नुकतेच त्रिशालाने तिचे पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. मास्टर डिग्री मिळविल्यानंतर तिने त्याच्या सेलिब्रेशनचे बरेचसे फोटो पोस्ट केले आहेत. तिचे हे फोटो मोठ्या प्रमाणात पसंत केले जात असून, तिचे सर्वत्र कौतुकही केले जात आहे. त्रिशालाने होफ्स्ट्रा विद्यापीठात तिचे शिक्षण घेतले आहे. या अगोदर तिने न्यू यॉर्कच्या जॉन जे कॉलेज आॅफ क्रिसमिनल जस्टिसमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. अशात ही चर्चा आहे की, आता त्रिशाला संजय दत्तच्या प्रॉडक्शन हाउसची जबाबदारी सांभाळणार आहे. सध्या तिचे फोटो पाहायला मिळत आहे.