प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर संदीप सिंगचा मानहानीचा दावा
सुशांतसिंगच्या मृत्यूनंतर अनेकांनी संदीपवर शंका उपस्थित
नवी दिल्ली : सिने निर्माता संदीप सिंहने आपली सार्वजनिक प्रतिमा मलिन करणाऱ्या टीव्ही चॅनल्सविरोधात मानहानीचा खटला दाखल करणार आहे. अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूनंतर अनेकांनी संदीपवर शंका उपस्थित केली गेली. अशा सर्व चॅनल्स आणि इतर काही व्यक्तींना त्याने कायदेशीर नोटीस पाठवली आहे. संदीप आणि सुशांतची जवळची मैत्री होती.
संदीपने पाठवलेली कायदेशीर नोटीस आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केलीय. प्रतिमा मलिन करणे आणि खोट्या बातम्या चालवण्याबद्दल ही कायदेशीर नोटीस आहे. विना अट सार्वजनिकरित्या माफी मागावी असे यामध्ये म्हटलंय.
संदीप सिंहने मेरी कॉम, अलीगढ, सरबजीत, भूमि आणि पीएम नरेंद्र मोदींचा बायोपिक सारखी बॉलिवूड सिनेमा बनवले आहेत.
सुशांत सिंह राजपूतने १४ जूनला आपल्या वांद्रे येथील घरी आत्महत्या केली. संदीप हा सुशांतचा मित्र आणि परिवारातील जवळचा मानला जात असे. संदीप या प्रकरणात तात्काळ घटनास्थळी पोहोचणाऱ्यांपैकी एक आहे.
सीबीआय चौकशी पूर्ण
अभिनेता सुशांतसिह राजपूत मृत्यूप्रकरणाची सीबीआय करत असलेली चौकशी पूर्ण झालीय. सीबीआयला याप्रकरणात कोणतेही कट कारस्थान आढळले नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सीबीआयने आपली चौकशी पूर्ण केली असून पटणाच्या सीबीआय कोर्टात यासंदर्भातील अहवाल सादर केला जाणार आहे.
अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर ही आत्महत्या नसून हत्या होती असा ठपका ठेवण्यात आला होता. राज्य सरकारच्या मोठ्या नेत्यांच्या दबावामुळे हे प्रकरण पुढे येत नसल्याचा आरोप विरोधकांनी केला. या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले.
त्यानंतर हा तपास सीबीआयकडे देण्यात आला. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करताना बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण बरेच दिवस चर्चेत राहीले. पण प्रत्यक्ष सुशांत मृत्यू प्रकणात काही महत्वाची माहीती समोर येत नव्हती. त्यानंतर आता सीबीआयने हा तपास पूर्ण केल्याचे सांगण्यात येतंय.