मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ठिकठिकाणी 'सांग सांग भोलानाथ पैसा मिळेल का?' असे होर्डिंग्ज नागरिकांचं लक्ष वेधून घेत होते. त्यामुळे लोकांमध्ये होर्डिंग्सविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. हे होर्डिंग्स नक्की कशाचे आहे. याबाबत अनेकांना प्रश्न पडला होता. हे होर्डिंग कोणत्या जाहिरातीचं आहे की अजून कोणत्या दुसऱ्या गोष्टीचं आहे. याबाबतचा खुलासा अखेर झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बस स्टँडपासून प्लाय ओव्हरपर्य़ंत सगळ्य़ाच ठिकाणी सांग सांग भोलानाथ पैसा मिळेल का? असे बॅनर पाहायला मिळत होते. हे होर्डिंग्स सिनेमाच्या प्रमोशनचे होते. ये रे ये रे पैसा या सिनेमाचं वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर झी मराठीवर करण्यात आलं. ये रे ये रे पैसा' हा मराठी चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता.


दिग्दर्शक संजय जाधव यांच्या ये रे ये रे पैसा चित्रपटात तेजस्विनी पंडीत, उमेश कामत, संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव यांची मुख्य भूमिका होती. या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. हिंदीनंतर मराठी पहिल्यांदाच असा कॉमेडी सिनेमा प्रेक्षकांनी अनुभवला.



अंधेरीत फ्लायओव्हरवर या सिनेमाच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरचं अनोख्या प्रकारे प्रमोशन करण्यात आलं. ज्यामध्ये एका गाडीतून नोटा पडचताना दिसत आहे.