मुंबई : 8 मे रोजी 'रॉकी' चित्रपटाला 40 वर्षे पूर्ण झाली. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते नर्गिस दत्त आणि सुनील दत्त यांचा मुलगा संजय दत्त या चित्रपटात मुख्य भूमिकेत होता. यानिमित्ताने एक थ्रोबॅक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये सुनील दत्त आणि संजय दत्त ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाइटमध्ये आपापसात बोलताना दिसत आहेत. पण या दोघांमधील रिकामी जागा लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. ही रिकामी जागा संजय दत्तने नरगिस यांच्यासाठी सोडली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा फोटो संजय दत्तचा पहिला सिनेमा 'रॉकी'च्या प्रीमियर वेळीचा आहे. या फोटोमध्ये सुनील दत्त आणि संजयने जागा सोडली होती. ज्याचं कारण अत्यंत भावनिक आहे. संजय दत्तचा पहिला चित्रपट पूर्ण होण्यापूर्वीच त्याची आई नर्गिस दत्त यांनी या जगाचा निरोप घेतला. संजय दत्तने ही जागा आईसाठी रिक्त ठेवली होती. संजू बाबांचा असा विश्वास होता की त्याच्या पहिल्या चित्रपटाच्या प्रीमिअरच्या निमित्ताने त्याची आई नक्कीच त्याला आशीर्वाद देण्यासाठी येईल.



नर्गिस यांना होता कॅन्सर
हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री नर्गिस दत्त यांना १९८० साली कर्करोगाचा त्रास सुरु झाला होता. नर्गिस आपला मुलगा संजूवर खूप प्रेम करायचा आणि त्यांच्या मुलाचा पहिला चित्रपट 'रॉकी' पाहण्याची संधी मिळावी अशी त्यांची मनापासून इच्छा होती. पण नशिबाला हे मान्य नव्हतं. 'रॉकी' चित्रपटाच्या प्रीमिअरच्या काही दिवस आधी नारगिसने जगाला निरोप दिला ही अत्यंत दु:खद गोष्ट असेल. कर्करोगाची लढाई लढणार्‍या नर्गिस यांनी ३ मे १९८१ रोजी अखेरचा श्वास घेतला.


रॉकी या सिनेमात टीना मुनीम, अजमद खान, शमी कपूर, राखी, रीना रॉय सोबत या सिनेमांत बरीच मोठी स्टारकास्ट होती. या सिनेमाचं दिग्दर्शन संजय दत्तचे वडिल सुनील दत्त यांनी केलं आहे.


संजय दत्तने केला कॅन्सरचा सामना
काही महिन्यांआधी संजय कॅन्सरच्या चौथ्या टप्प्यात होता. मुंबईमधील कोकिलाबेन या हॉस्पिटलमध्ये तो कॅन्सरवर झुंझ देत होता. मात्र संजयने कॅन्सरवर मात केली असल्यांचं त्याची पत्नी मान्यता दत्तने सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत सांगितलं .