मुंबई : भारत-पाकिस्तान दरम्यान झालेल्या युद्धावर आधारित 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेता अजय देवगण, संजय दत्त, परिणीती चोप्रा, सोनाक्षी सिन्हा, राणा डुग्गुबाती आणि एमी विर्क प्रमुख भूमिका साकारणार आहेत. चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार यांनी याबाबत ट्विटरवरून माहिती दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिषेक दुधैया यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात अजय देवगण भारतीय वायूसेनेचे विंग कमांडर विजय कर्णिक यांची भूमिका साकारणार आहे. १९७१ साली भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धादरम्यान विजय कर्णिक भुज विमानतळाचे प्रभारी होते. 




पाकिस्तानकडून जोरदार बॉम्बहल्ला होत असूनही कर्णिक यांच्यासह ५० वायूसेनेचे अधिकारी आणि ६० सैन्य अधिकाऱ्यांनी विमानतळाची सुरक्षा केली होती. बॉम्बहल्ल्यामुळे भुज विमानतळावरील रनवेचं अतिशय नुकसान झालं होतं. परंतु भारतीय सैन्यातील अधिकाऱ्यांना आणण्यासाठी जाणाऱ्या विमानांना मार्ग मोकळा मिळावा यासाठी कर्णिक आणि त्यांच्या टीमने ३०० स्थानिक महिलांच्या मदतीने रनवे पुन्हा निर्माण केला होता.