नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याची पत्नी मान्यता ही आपल्या फोटोजमुळे खुपच चर्चेत असते. हे फोटोज मान्यताने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्विम सूट, शॉर्ट परिधान केलेले फोटोज मान्यता इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. मान्यताचे हे फोटोज व्हायरलही झाले होते. खासकरुन मान्यताचा लाल बिकीनीमधील फोटो. मात्र, या प्रकरणी मान्यताचा पती आणि अभिनेता संजय दत्त खूपच नाराज असल्याचं पहायला मिळत आहे.


अभिनेता संजय दत्त आपल्या आगामी 'भूमी'तून मोठ्या पडद्यावर कमबॅक करत आहे. संजय दत्तच्या पत्नीने सोशल मीडियात शेअर केलेल्या फोटोजमुळे तो सध्या खूप नाराज आहे.



मीडिया रिपोर्ट्सनुसार, मान्यता दत्तने असे फोटोज सोशल मीडियात का शेअर केले असा प्रश्न संजय दत्तच्या मित्राने उपस्थित केला होता. मान्यता दत्तला बॅालिवूडमध्ये करियर करायचे आहे, अशी चर्चा आहे. दिग्दर्शकांना आकर्षित करण्यासाठी मान्यता हे सगळं करते असे म्हटले जात आहे.


आपल्या कुटुंबातील महिलांनी सिनेमात काम करु नये असे संजय दत्तला नेहमीच वाटते. संजय दत्तच्या वडीलांनीही कधी सिनेमांत मुलींना करियर करण्यास दिलं नाही. त्याचप्रमाणे आता संजय दत्तलाही वाटत आहे.