मुंबई : बॉलीवूड अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) सध्या त्याच्या जिवंत व्यक्तिरेखेसाठी ओळखला जातो. आज तो एक यशस्वी हिरो आहे. परंतु त्याचा भूतकाळ हा फारच वादग्रस्त आणि तणावपूर्ण राहिला आहे. याबद्दल जवळजवळ सर्वांनाच माहित आहे. ऐवढेच काय तर त्याच्या जीवनावर आधारीत सिनेमा देखील आला आहे, ज्यामुळे त्याच्या आयुष्याबाबत तुम्हाला थोडासा अंदाज बांधता येईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय दत्तबद्दल तुम्ही तशा अनेक बातम्या ऐकल्या असतील, परंतु आज आम्ही जी माहित सांगणार आहोत, जी जाणून घेतल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल.


बॉलीवूडचे दिग्गज अभिनेता सुनील दत्त आणि नर्गिस दत्त यांचा मुलगा संजय दत्तने (Sanjay Dutt) आपल्या आयुष्यात खूप कठीण काळ पाहिला आहे. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणामुळे संजय 1993 मध्ये तुरुंगात होता हे सर्वांनाच माहीत आहे.


त्यानंतर अनेक वर्ष शिक्षा भोगल्यानंतर संजय एका रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होण्यासाठी आला होता. यावेळी संजयने आपल्या तुरुंगातील जीवनातील अनुभव उघडपणे शेअर केले होते आणि आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


रक्त पिण्यासाठी जायचे, परंतु स्वत:च मरायचे


आपल्या हे तर माहित आहे की, संजय दत्तला (Sanjay Dutt) ड्रग्जचे खूप व्यसन जडले होते. ज्याच्या आहारी तो इतका गेला होता की, त्याच्याशिवाय जगणे संजयला कठीण झाले होते. यासाठी त्याला सुधार सेंटरमध्ये ही ठेवण्यात आले होते. मात्र तेथून देखील तो एकदा पळून आला होता.


आपल्या ड्रग्स घेण्याबद्दलच्या सवयीबद्दल उघडपणे सांगताना एकदा संजय दत्त म्हणाला की, असा एकही ड्रग्स नाही जो, त्याने घेतला नाही. ज्यामुळे त्याच्या शरीरातील रक्त असं झालं होतं, की, डास त्याचं रक्त पिऊन मरायचे. याबद्दल सांगताना संजय दत्त म्हणाला, "कदाचित माझ्या रक्तात औषधांचा ओव्हरडोस झाल्यामुळे असे झाले असावे. "


नक्की काय म्हणाला संजय दत्त


आपल्या नशेचा संदर्भ देत, एका रिअॅलिटी शोमध्ये पोहोचलेल्या संजयने खुलासा केला की, 'मी झोपलेलो असताना पाहायचो की, माझ्याकडे डास आला... तो मला चावायचा मी हे देखील पाहायचो, परंतु तो मला चावायचा, त्यानंतर तो त्याचे पंख हलवायचा परंतु उडायचा नाही आणि काही वेळाने तो मरायचा. म्हणजे विचार करा माझ्या रक्तात किती ड्रग्स असतील, की नशेत त्या मच्छरला उडचता देखील यायचे नाही. मला कधीकधी हे आठवून हसायला देखील येतं, तो मच्छर बिचाऱ्याने विचार केला असेल की माझं रक्त तो पियेल, परंतु तो स्वत:च मरायचा" संजयच्या या स्पष्टवक्तेपणानुळे शोमध्ये बसलेले सर्वजण हसू लागले.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


संजय दत्त पुढे म्हणाला की, 'जो नशा कम करण्यात आणि आपल्या कुटुंबासोबत आहे, ते कुठेच नाही. त्यामुळे मी सर्व तरुणांना सांगू इच्छितो की, ड्रग्जपासून दूर राहा.'