मुंबई : अभिनेता संजय दत्त हा अशा अभिनेत्यापैकी एक आहे. जो सोशल मीडियावर कायम चर्चेत असतो. संजय दत्तला त्याचा चाहता वर्ग संजू बाबा म्हणून ओळखतो. जितका चर्चेत संजूबाबा असतो तितकीच चर्चेत त्याची पत्नी मान्यता दत्तदेखील असते. आता पुन्हा एकदा मान्यता चर्चेत आली आहे. मात्र वेळी ती चर्चेत तिच्या विचीत्र फॅशनमुळे आहे. मान्यता दत्त आणि संजय दत्त दोघंही नुकतेच स्पॉट झाले आहेत. यावेळचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीत पाहून मान्यता दत्त मात्र चांगलीच ट्रोल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडीओत संजय आणि मान्यता एअरपोर्टवर चालताना दिसत आहेत. यावेळी त्यांना पापाराझींनी त्यांच्या कॅमेराचत कैद केलं. यावेळी संजयने चेक्सचं शर्ट आणि जीन्स परिधान केली होती. तर मान्यताने पांढऱ्या रंगाचा शर्ट ड्रेस परिधान केला होता. त्यामुळे तिला ट्रोलर्स ट्रोल करत विचारतायेत की, खाली पॅन्ट घालायला विसरलीस का?  मान्यताला सोशल मीडियावर चांगलच ट्रोल करत आहेत. अनेकदा मान्यता ट्रोलिंगची शिकार होते. अनेकांनी तिच्या या व्हिडीओवर कमेंट करत तिचा चांगलाच क्लास घेतला आहे.


अनेकांना तिचा हा लूक क्लासी वाटला आहे तर अनेकांनी मात्र तिला जबरदस्त ट्रोल केलं आहे. एका चाहत्याने तिला कमेंट करत विचारलं आहे की, पँन्ट पेहनना भूल गयी? तर अजून एकाने विचारलं की, Forget to wearing a pant तर अजून एकाने लिहीलंय, एवढे पैसे काय कामाचचे की एक पँन्ट खरेदी करु शकत नाही. तर अजून एकाने म्हटलंय, मला वाटतं मॅडमच्या रात्रीची नशा उतरली नसेल म्हणून ती पँन्ट घालायला विसरली असेल. अशा अनेक प्रकारच्या कमेंट युजर्स या व्हिडीओवर करुन तिला ट्रोल करत आहेत. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


पत्नी मान्यतासोबत संजय त्याच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहे. संजयपेक्षा 19 वर्षांनी लहान मान्यता ही त्याच्या आयुष्यात तेव्हा आली जेव्हा त्याचा दुसरी पत्नी रिया पिल्लईसोबत घटस्फोट झाला नव्हता. दुबईमध्ये लहानाची मोठी झालेली मान्यता 1999 च्या सुमारास कुटुंबासह मुंबईत आली आणि चित्रपटसृष्टीत तिचं नशीब आजमावू लागली. 2005 मध्ये मान्यता आणि संजय रिलेशनशिपमध्ये आले आणि 2006 मध्ये स्टार स्क्रीन अवॉर्ड्समध्ये एकत्र हजेरी लावत त्यांनी रिलेशनशिपवर शिक्का मोर्तब केलं. आणि लवकरच या जोडीने लग्नगाठ बांधली.