Sanjay Dutt meets Pervez Musharraf:  अभिनेता संजय दत्त हा त्याच्या चित्रपटांसोबतच त्याच्या मनमिळाऊ स्वभावासाठीही ओळखला जातो. त्याची आतापर्यंतची कारकिर्द सर्वांनीच पाहिली. या प्रवासात संजुबाबानं जितके चांगले दिवस पाहिले तितक्याच वाईट दिवसांचाही सामना त्यानं केला. कारावासाची शिक्षाही तो भोगून आला. गंभीर आजावर त्यांनं मातही केली. आता कुठे संजय दत्तनं सर्व प्रकरणांपासून दूर येत निश्चिंत जगण्यास सुरुवात केलेली असतानाच पुन्हा एकदा तो वादग्रस्त मुद्द्यामुळं चर्चेत आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सोशल मीडियावर संजय दत्तचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये संजुबाबा आणि पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांची भेट झाल्याचे क्षण दिसत आहेत.


फोटोमध्ये संजुबाबा काळ्या रंगाच्या टीशर्टमध्ये दिसत आहे. तर, मुशर्रफ व्हिलचेअरवर बसलेले दिसत आहेत. ते या बॉलिवूड अभिनेत्याकडे एकटक पाहताना दिसत आहेत. व्हायरल फोटोंच्या कॅप्शननुसार हा फोटो दुबईतील एका जीममधील असल्याचं म्हटलं जात आहे.


भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांमध्ये हा फोटो तुफान शेअर केला जात आहे. जिथं अनेकांनीच संजुबाबावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. काहींनी या फोटोमध्ये मुशर्रफ यांच्या प्रकृतीची विचारपूस आणि चर्चा करण्यासही सुरुवात केली आहे.



कारगिलचा कट आखणाऱ्या आणि दहशतवाद्यांची साथ देणाऱ्या व्यक्तीशी तू संपर्क साधूच कसा शकतोस असा सवालही संजय दत्तला काहींनी विचारला आहे. भारत – पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांमध्ये असणारं नातं हे ताणावाच्या सावटाखाली आहे. अशा परिस्थितीत व्हायरल होणारे हे फोटो अप्रत्यक्षरित्या या तणावात आणखी भर टाकताना दिसतात.