कारागृहातील दिवसांबद्दल काय म्हणाला संजय दत्त?
काय म्हणाला संजय दत्त
मुंबई : अभिनेता संजय दत्त आणि त्याच्या संजू या बायोपिकची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत आहे. संजय दत्तचा आता कोणताच सिनेमा प्रदर्शित होत नसला तरीही संजू हा सिनेमा या चर्चेसाठी महत्वाची बाब आहे. संजू हा सिनेमा 29 जुलै रोजी शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. संजय दत्तची भूमिका अभिनेता रणबीर कपूरने साकारली आहे. या सिनेमांत संजय दत्तचे अनेक पैलू दाखवले आहेत. संजय दत्तचे असे म्हणणे आहे की, कारागृहात घालवलेल्या दिवसांनी माझा अहंकार तोडला आहे त्याच दिवसांनी मला चांगला माणूस बनवलं आहे. संजय दत्तने शेअर केली कारागृहातील आठवण...
काय म्हणला संजय दत्त
मी कैदी होतो ते दिवस काही रोलर कोस्टरपेक्षा कमी नव्हते. जर सकारात्मक विचार करायचा झाला तर या दिवसांनी मला बरंच काही दिलं. मला एक उत्तम नागरिक होण्यासाठी या दिवसांची मदत झाली. पुढे संजय दत्त म्हणाला की, कुटुंब आणि आपल्या जवळच्या व्यक्तींपासून लांब राहणं हे एक मोठं चॅलेंज होतं. या दिवसांत मी माझ्या शरीराला उत्तम आकार देण्याचा प्रयत्न केला. मी त्यावेळी वजन आणि डंबलच्या जागी कचऱ्याचा डब्बा आणि मातीच्या गोण्यांचा वापर केला आहे. दर सहा महिन्यांनी कारागृहात सांस्कृतिक कार्यक्रम होतं. त्यामध्ये मी लोकांना गाणं, डान्स शिकवायचो.
संजय दत्तने सांगितलं की, या कठीण प्रसंगात कारागृहातील इतर कैदी हेच माझे कुटूंब बनले होते. जेव्हा मी खचून जायचो तेव्हा हेच मला प्रोत्साहन द्यायचे. कारागृहात घालवलेल्या दिवसांमध्ये मी खूप काही शिकलो. या दिवसांनी माझा अहंकार मोडला आहे. कारागृहातील दिवस खूप महत्वाचे होते. जेव्हा हे दिवस आठवतो तेव्हा संजय म्हणतो की, ज्या दिवशी मी कारागृहातील सुटलो तो माझ्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा दिवस होता. मी माझे वडिल सुनील दत्त यांना आठवत होतो. माझी खूप इच्छा होती की त्यांनी मला सुटलेलं पाहावं.