मुंबई : 'द क्रेजी अनटोल्ड स्टोरी ऑफ बॉलिवूड्स बॉय' नावाच्या पुस्तकामध्ये संजय दत्तने त्याच्या जीवनप्रवास लिहणार्‍या लेखक आणि प्रकाशकाला कायदेशीर नोटीस दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय दत्तने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या खाजसी जीवनाबद्दल जाहीरपणे काहीही लिहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे यासर उस्मान लिखित आणि जगनॉर्टद्वारा प्रकाशित पुस्तकापासून  संजय दत्त लांब आहे. 


संजय दत्तची ट्विटरवर माहिती 


संजय दत्तने दिलेल्या माहितीनुसार, त्याने कोणत्याही प्रकाशकाला,लेखकाला त्याचा जीवनप्रवास लिहण्याचा हक्क दिलेला नाही. वकिलाच्या मार्फत त्याणे दोघांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. 
1990 दरम्यानच्या काळात गॉसिपच्या माध्यमातून जी माहिती समोर आली आहे त्यानुसार संजय दत्तच्या आत्मचरित्रामध्ये माहिती लिहण्यात आली आहे. पुढील कारवाईसाठी संबंधित टीमसोबत बोलणी सुरू आहे. 


संजय दत्तचे ट्विट  


 



प्रकाशकांनीही संजय दत्तच्या आत्मचरित्रातील कोणताही भाग मीडियामध्ये प्रसारित केला जाणार नाही असे लिहले आहे. त्यावर उत्तर देताना  संजय दत्त म्हणाला,'मी आशा कारतो की भविष्यात अशाप्रकारे कोणतेही लिखाण होणार नाही. तसेच माझ्या आणि माझ्या परिवारातील लोकांबद्दल काहीही लिहले  जाणार नाही याची दक्षता घ्या.'