संजय दत्तला होती एन्काऊंटरची भीती! माजी IPS अधिकाऱ्यानं सांगितला येरवडा तुरुंगातील ट्रान्सफरचा किस्सा
Sanjay Dutt was Afraid tha He Would Be Killed In Encounter : संजय दत्तला का वाटत होती एन्काऊंटरची भीती! नक्की काय होतं प्रकरण
Sanjay Dutt was Afraid tha He Would Be Killed In Encounter : बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचं आयुष्य हे नेहमी चर्चेत असतं. त्याची सुरुवात ही 1993 मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्ब ब्लास्टनं झाल्याचं म्हणता येईल. कारण त्या प्रकरणात संजय दत्तला तुरुंगवास देखील झाला होता. आता माजी IPS अधिकारी मीरान चड्ढा बोरवंकर यांनी खुलासा केला की जेव्हा संजय दत्तला दोषी घोषित करण्यात आले तेव्हा ते DGP म्हणून कार्यरत होते. त्यांनी संजय दत्तविषयी अनेक गोष्टी सांगत असताना त्यांनी खुलासा केला की एकदा संजय दत्तला त्याचा एनकाउंटर होणार अशी भीती वाटू लागली होती.
मीरान चड्ढा बोरवंकर यांनी त्यांच्या पुस्तकात सांगितले ती जेव्हा संजय दत्तला दुसऱ्या तुरुंगात ट्रान्सफर करण्यात येणा होते तेव्हा त्याचा स्वत: वरचा ताबा सुटला. त्यांना साइरस ब्रोटा मुलाखतीत विचारण्यात आलं होतं की संजय दत्त एक चांगला कैदी होता का? त्यावर ते म्हणाले की मी पंजाबचा आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी संजयने त्याच्या सूत्रांचा वापर केला. त्यानं मला थोडं लाजवलं. पण मुख्य मुद्दा होता प्रसारमाध्यमांच्या आरोपाचा की आम्ही त्याला विशेष वागणूक दिली, खरंतर असं काही आम्ही केलचं नाही आणि तो नीट वागायचा. कारण त्याचं पेरोलवर जाणं हे सगळं त्याच्या तुरुंगातील वागणूकीवर आधारीत होतं. जर तो चांगला वागला नसता तर आम्ही त्याला पेरोलवर सोडलं नसतं. तो काम करायचा आणि बिडी आणि सिगरेटही खरेदी करायचा. एकंदरीत तो इथे अधिक चांगला वागला हे त्याला जाणवले.'
पुढे संजय दत्तला तुरुंगात घरातील जेवण मिळण्यावर झालेल्या वादावर विचारलं तेव्हा मीरान चड्ढा बोरवंकर म्हणाले की यात कोणाताही वाद नव्हता, कारण हे सत्य आहे. जेव्हा कोणते राजकारणी, बॉलिवूड हीरो किंवा हीरोईन तुरुंगात जातात, तेव्हा त्यांना वाटतं की ते VIP आहेत. मात्र, कायद्याविषयी त्यांना खूप कमी माहिती आहे. जेव्हा संजय दत्त आर्थर रोज तुरुंगात होते, तेव्हा तो अंडरट्रायल होता आणि त्याला घरचं जेवण करण्याची परवानगी होती. एकदा दोषी ठरल्यानंतर आम्ही त्याची अंडर-ट्रायलमधून येरवड्याला बदली केली, तेव्हा त्याचा कायदेशीरपणे दोषी ठरला.
हेही वाचा : 10 लाखांचं घड्याळ, लाखो रुपयांचे शूज अन्...; ऑरीची 'बिग बॉस 17'मध्ये रॉयल एन्ट्री! सलमानही थक्क
पुढे त्यांनी सांगितलं की संजय दत्तला दोषी ठरवल्यानंतर पोलिसांनी त्याला घरचं जेवण देण्याच्या निर्णयाचा विरोध केला आणि या निर्णयाचा संजयनं विरोध केला नाही. आर्थर रोड कारागृहातून पुण्याच्या येरवडा कारागृहात हलवलं असताना संजय घाबरला होता, त्याला चकमकीत मारलं जाईल याची भीती त्याला होती. 'वाटेत एनकाऊंटरमध्ये त्याला मारले जाईल अशी भीती संजय दत्तला होती! तो इकता घाबरला होता की त्याला घाम फुटला आणि त्याला ताप आला होता. दुसरीकडे त्याची आर्थर रोड तुरुंगातून सुटका झाली अशी बातमी पसरली आणि तुरुंगाच्या गेटबाहेर खूप गर्दी झाली होती. त्यामुळे हे ट्रान्सफर पुढे ढकलण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि बाहेर असलेल्या टीमला परत बोलावले. त्यानंतर जेव्हा हे प्रकरण शांत झालं तेव्हा त्याची ट्रान्सफर करण्यात आली.