मुंबई : भन्साळींचा चित्रपट म्हणजे भवदिव्यता हे आता समीकरणच झालंय. त्यांचे सेट्स, कामातील बारकाई, परफेक्शन, नट-नटांचे ड्रेस, दागिने आणि गाणी सारं काही खास, विशेष. सध्या ‘पद्मावती’ या चित्रपटाची चर्चा सर्वत्र आहे. अलीकडेच  अभिनेत्री दीपिका पदुकोणवर चित्रित झालेले घुमर गाणे प्रदर्शित झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

‘पद्मावती’ ही भूमिका साकारण्यासाठी दीपिकाने घेतलेली मेहनत आणि तिचे समर्पण पाहता दिग्दर्शक संजय लीला भन्साळी तिच्यावर भलतेच इम्प्रेस झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दीपिकाने या चित्रपटातील ‘घुमर’ या गाण्यावर सादर केलेले नृत्य आणि संपूर्ण चित्रपटातील लूक सांभाळत एक राणी म्हणून कॅमेऱ्यासमोर उभं राहण्याचा तिचा अंदाज पाहून भन्साळीही प्रभावित झाले.


या गाण्यासाठी दीपिकाने बरीच मेहनत घेतली होती. वजनदार लेहंग्यापासून ते बहुविध दागिन्यांपर्यंत सर्वच गोष्टी उत्तमरित्या हाताळत तिने घुमर नृत्यही  नजाकतीने सादर केले. दीपिकाच्या याच अंदाजाने भन्साळींचे मन जिंकले असून, यासाठी त्यांनी तिला एक भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपटात तिने घातलेला कोणताही एक लेहंगा दीपिका स्वत:कडे कायमस्वरूपी ठेवू शकते. त्यांनीच अशी  मुभा तिला दिली आहे. एका कलाकारासाठी दिग्दर्शकाने अशा प्रकारे दाद देणे फार महत्त्वाचे असते. ही तर तिच्या कामाची पोचपावती आहे, असे म्हणायला हरकत नाही.