Aishwarya Rai Said No to Ram Chahe Leela Song : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ऐश्वर्या ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. दरम्यान, नुकत्याच समोर आलेल्या रिपोर्टनुसार ऐश्वर्याला संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांनी रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांच्या 'राम लीला' (Ram Leela) चित्रपटातील 'राम चाले लीला' (Ram Chahe Leela) गाण्यासाठी विचारले होते. मात्र, सलमान खानमुळे (Salman Khan) ऐश्वर्यानं संजय भन्साळी यांना नकार दिला होता. चला तर जाणून घेऊया ऐश्वर्यानं नकार देण्याच कारण काय...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर, चित्रपटातील 'राम चाले लीला' या गाण्यात आपण सगळ्यांनी प्रियांका चोप्राला (Priyanka Chopra) पाहिलं होतं. या गाण्यातील प्रियांकाचा डान्स तर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. आजही लोक त्याचा व्हिडीओ पाहतात. मात्र, प्रियांका आधी संजय लीला भन्साळी यांनी ऐश्वर्याला या गाण्यासाठी विचारले होते. 


गाण्याचे बोल बदलण्याची केली मागणी


मीडिया रिपोर्ट्सनुसार ऐश्वर्याला 'राम लीला' चित्रपटात संजय लीला भन्साळी यांनी गाण्याची ऑफर दिली होती. पण सलमानमुळे ऐश्वर्यानं ही ऑफर नाकारली. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की 'राम लीला' चित्रपट आणि 'राम चाहे लीला' या गाण्यांचा सलमानसोबत काय संबंध आहे, खरंतर संजय लीला भन्साळी यांनी 'राम चाहे लीला' हे गाणं नाही तर 'थप्पड से नहीं प्यार से डर लगता है' हे गाणं ऑफर केलं होतं.


हेही वाचा : सासु-सुनेत जुंपली, सुनेला कंटाळून 'या' Actress नं मुलाशीच तोडले संबंध
 
दरम्यान, हे शब्द सलमानच्या 'दबंग' (Dabangg) चित्रपटातील आयकॉनिक डायलॉगसारखे आहेत आणि त्यामुळे ऐश्वर्यानं चित्रपटात काम करण्यास नकार दिला. ऐश्वर्यानं संजयला गाण्याचे बोल बदलण्याची अट घातली, जी संजय लीला भन्साळी यांना मान्य नव्हती. ऐश्वर्यानं चित्रपटाला नकार देताच संजय लीला भन्साळी यांनी प्रियांकाला या गाण्यासाठी विचारले. मात्र, त्यानंतर चित्रपटातील गाणं का बदलण्यात आलं या विषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही.