सासु-सुनेत जुंपली, सुनेला कंटाळून 'या' Actress नं मुलाशीच तोडले संबंध

'या' लोकप्रिय अभिनेत्रीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मुलाशी सर्व नाती तोडल्याचा खुलासा केला असून त्या मागचं कारण देखील सांगितलं आहे. 

Updated: Dec 8, 2022, 11:45 AM IST
सासु-सुनेत जुंपली, सुनेला कंटाळून 'या' Actress नं मुलाशीच तोडले संबंध title=

Pakistani Actress Saba Faisal Fight With Daughter In Law Neha Malik : पाकिस्तानी जेष्ठ अभिनेत्री सबा फैजल (pakistani actress saba faisal) यांच्या घरात दुख: चं वादळ आलं आहे. सबा फैजल यांनी त्यांची सुन नेहा मलिक आणि मोठा मुलगा सलमान फैजलविषयी सांगत एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांच्या घरात सुरु असलेल्या काही खासगी गोष्टींविषयी खुलासा केला आहे. त्यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

अभिनेत्रीनं मोडली मुलाशी सर्व नाती

सबा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही बातमी शेअर केली आहे. या व्हिडीओत सबा सुन नेहा आणि मोठा मुलगा सलमान विषयी सांगताना  म्हणाल्या, 'नेहासारखी नकारात्मक स्त्री कोणाच्याही कुटुंबात आली तर नातं बिघडते. गेल्या चार वर्षांपासून मला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे सगळं फक्त माझ्या मुलामुळे होत आहे. मी नेहमी हाच विचार करायचे की माझा मुलगा अशा स्त्रीसोबत आयुष्य घालवणार आहे. अनेक नेटकऱ्यांनी नेहाच्या गोष्टी ऐकल्या आणि मला खूप काही सुनावलं. मी गप्प सगळं ऐकत होते, माझी मुलगी गप्प होती. पण आता मी सांगते की नेहासोबत माझं, माझ्या मुलीचं, माझ्या पतीचं आणि माझ्या लहान मुलाचं अर्सलानचा नेहाशी काहीही संबंध नाही. सलमानला तिच्यासोबत रहायचं असेल तो राहिल, पण सलमानचा आणि माझा कोणताही संबंध नाही.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सबा फैजल यांचा धाकटा मुलगा अर्सलाननेही त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत वहिनीचे सत्य सगळ्यांसमोर मांडले आहे. या पोस्टमध्ये अर्सनाल नेहाला मनोरुग्ण आणि गुंड म्हणाला आणि पुढे नेहा ही पहिल्या दिवसापासूनच त्यांचं कुटुंब तोडण्याचा प्रयत्न करत होती. गेल्या चार वर्षांपासून आमचा मानसिक छळ होत आहे. माझी आई आणि बहीण गप्प आहेत पण मी यापुढे गप्प बसू शकत नाही, त्यामुळे याविरोधात बोलण्यासाठी मी पुढे आलो आहे.  अर्सनल पुढे म्हणाला की नेहा तिचा पती आणि माझा भाऊ सलमानला शोमध्ये काम करू देत नाही. आतापर्यंत सबा आणि त्यांच्या कुटुंबीयांनी नेहा आणि सलमानला त्यांना हवं ते सगळं दिलं आहे. पण भविष्यात असं होणार नाही. 

हेही वाचा : 'काळी मांजर...' ; वर्णभेदाचा सामना करणाऱ्या Priyanka Chopra ला हे काय ऐकावं लागलं?

'इश्क है' फेम सलमाननं 2019 मध्ये नेहा मलिकसोबत लग्न केलं. या लग्नात अनेक पाकिस्तानी सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. दरम्यान, सलमान आणि नेहा या दोघांच्या घटस्फोटाची बातमी गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होत्या. तर एका कार्यक्रमात हजेरी लावल्यानंतर सबा घटस्फोटाच्या बातमी विषयी म्हणाली की ही फक्त अफवा आहे. (pakistani actress saba faisal fight with daughter in law neha malik called her psychopath)