नवी दिल्ली : संजय लीला भन्साळी यांचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित 'पद्मावत' सिनेमा अखेर प्रदर्शित झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या वादामुळे या सिनेमाची सर्वत्र जोरदार चर्चा होती आणि त्यासोबतच उत्सुकताही होती.


फेसबुकवर सिनेमा लीक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वादानंतर हा सिनेमा प्रदर्शित करण्यास सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले. त्यानंतर 'पद्मावत' सिनेमा देशभरात प्रदर्शित करण्यात आला. मात्र, फेसबुकवर हा सिनेमा लीक करण्यात आल्याचं समोर आलं आहे.


थेट सिनेमागृहात केलं FB Live


'पद्मावत' सिनेमा पाहण्यासाठी गेलेल्या एका चाहत्याने फेसबुकवर हा सिनेमा लीक केला आहे. फेसबुकवर एका पेजवर सिनेमागृहातुन चक्क फेसबुक लाइव्ह करत सिनेमा लीक करण्यात आला आहे.


२५ मिनिटे सिनेमा Live


मिळालेल्या माहितीनुसार, 'जाटों का अड्डा' या फेसबुक पेजवरुन हा सिनेमा फेसबुक लाईव्ह करण्यात आल्याचं बोललं जात आहे. जवळपास २५ मिनिटे 'पद्मावत' हा सिनेमा लाईव्ह करण्यात आला.


युजर्सने केला शेअर


फेसबुक लाईव्हचा हा व्हिडिओ तब्बल १५,००० युजर्सने आपल्या वॉलवर शेअर केल्याचं समोर आला आहे.


१० लाख प्रेक्षकांनी पाहिला सिनेमा


हिंदी, तमिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित करण्यात आलेला 'पद्मावत' हा सिनेमा ६ ते ७ हजार स्क्रिन्सवर रिलीज करण्यात आला आहे. एका दिवसात जवळपास १० लाख प्रेक्षकांनी 'पद्मावत' सिनेमा पाहिला आहे.