`बाळासाहेबां`साठी शिवसेना - मनसेची होणार `ही` अनोखी युती
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावरील चित्रपटाची घोषणा बिग बी अमिताभ बच्चन आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे.
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावरील चित्रपटाची घोषणा बिग बी अमिताभ बच्चन आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे.
ठाकरे' असं या बायोपिकचं नाव
बाळासाहेबांवरील हा चित्रपट हिंदी आणि मराठी भाषेत बनणार आहे. या चित्रपटात अष्टपैलू अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेत दिसणार असून 'ठाकरे' असं या बायोपिकचं नाव असणार आहे. शिवसेना नेते संजय राऊत चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. पण आश्चर्याची बाब म्हणजे या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी मनसेचे नेते अभिजीत पानसे यांच्या खांद्यावर सोपवण्यात आलीये.
शिवसेना आणि मनसेची अशी अनोखी युती
'ठाकरे' चित्रपटाच्या निमित्तानं शिवसेना आणि मनसेची अशी अनोखी युती जुळून आलीय. दरम्यान, मार्च 2018 मध्ये या सिनेमाचं चित्रीकरण सुरु होणार असून बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी 23 जानेवारी 2019 ला हा सिनेमा प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे.