`संजू`चा `बाहुबली`ला मागे टाकत विक्रम
संजूने बनवला नवा रेकॉर्ड
मुंबई : अभिनेता संजय दत्त यांच्या जीवनावर आधारीत सिनेमा Sanju ने जोरदार सुरवात केली आहे. संजूने एक नवा रेकॉर्ड बनवला आहे. ज्यामध्ये त्याने बाहुबली सिनेमाला देखील मागे टाकलं आहे. संजू सिनेमा एका दिवसात सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. संजूच्या आधी हा रेकॉर्ड बाहुबली सिनेमाच्या नावावर होता. सिनेसमीक्षक तरण आदर्श यांनी सोमवारी ट्विटरवर ही माहिती शेअर केली आहे.
तरण आदर्श यांच्या मते रणवीर आणि राजकुमार हिराणी यांच्या संजू हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी संजूने 46.71 कोटी रुपयांची कमाई केली आहे. जी देशातील कोणत्याही सिनेमाने कमवलेली सर्वात जास्त कमाई आहे. याआधी बाहुबलीने -2 ने एकाच दिवशी 46.50 कोटींची कमाई केली होती.
तरण आदर्श यांच्यामते 3 दिवसात संजू सिनेमाने 120.06 कोटींची कमाई केली आहे. या वर्षातील हा सर्वात हिट सिनेमा ठरला आहे. रणवीर कपूर या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. सगळीकडेच सध्या सिनेमाची चर्चा आहे.