मुंबई : संजय दत्तवर आधारित बायोपिक येत आहे. संजू या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलिज झाला आहे. या सिनेमांत संजय दत्तचं आयुष्य मांडण्यात आलं आहे. संजू बाबाची लव लाइफ, फ्रेंडशिप, सिनेमाचं आयुष्य आणि महत्वाचं म्हणजे तुरूंगात घालवलेले दिवस हे या सिनेमांत दाखवण्यात आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रेलर रिलीज झाल्यानंतर सिनेमातील इतर कलाकार देखील समोर आले आहेत. या सिनेमांत संजय दत्तच्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाच्या व्यक्ती दिसल्या आहेत. यामध्ये मान्यता, सुनील दत्त, टीना मुनीम, नगरिस यांची भूमिका करणारे कलाकार स्पष्ट झाले आहेत.  



सिनेमांत मान्यता दत्तची भूमिका अभिनेत्री दिया मिर्जा करत आहे. ट्रेलरमध्ये पहिल्यांदा दियाची झलक पाहायला मिळाली. 



मनीषा कोयराला संजय दत्तच्या आईची भूमिका साकारत आहे. नरगिसचा रोल मनीषा करणार असून हा मोठा कमबॅक आहे. 



अभिनेता विक्की कौशल संजय दत्तच्या अगदी जवळच्या मित्राची भूमिका साकारत आहे. आपल्याला माहितच आहे संजय दत्तचा कुमार गौरव हा खास मित्र आहे. जेव्हा संजय दत्त या सिनेसृष्टीत आला तेव्हा कुमार गौरव हाच त्याचा जवळचा मित्र होता. 



संजय दत्त याच्या आयुष्यातील अगदी महत्वाची व्यक्ती सुनील दत्त. संजय दत्तच्या सर्व जडणघडणीत सुनील दत्त यांचा खूप मोठा रोल आहे. ही भूमिका अभिनेता परेश रावल साकारत आहे.



सोनम कपूर टीना मुनीमचा रोल साकारत आहे. टीना मुनीम ही संजय दत्तची सर्वात पहिली गर्लफ्रेंड असल्याचं सांगितलं जात आहे. रॉकी या सिनेमाच्या वेळी संजय आणि टीना यांच्यातील जवळीक वाढली होती.



अनुष्का शर्मा ही संजू सिनेमांत संजय दत्तच्या वकिलाची भूमिका साकारत आहे.