Sankarshan Karhade : लोकप्रिय मराठमोळा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. संकर्षन हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. नेहमीत संकर्ष हा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असतो. आता त्याचं चर्चेत असण्याचं कारण ही त्याची सोशल मीडिया पोस्ट आहे. संकर्षनं ही पोस्ट शेअर करत त्याच्या नाटकाच्या प्रयोगानंतर चाहत्यांसोबतच्या भेटीगाठीचा एक अनुभव सांगितला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संकर्षननं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. यावेळी त्यानं त्याच्या चाहतीच्या मेसेजचा स्क्रिनशॉर्ट शेअर केला आहे. तर त्यासोबत कॅप्शन देत म्हणाला की, "काल साताऱ्यामध्ये प्रयोगानंतर एक मॅडम भेटल्या त्यांच्याविषयी थोडं शेअर करतोय ..! वेळ असेल तर वाचा ..! त्यांनी म्हणे 12 वर्षांपूर्वी टेलिव्हिजन वरती माझं काम पाहिलं आणि घरी आईला सांगीतलं की मला संकर्षण सोबतच लग्नं करायचंय.. त्यावर बारावीतल्या त्या पोरीला आई म्हणाली; अभ्यास करा…. पुढे त्यांचं शिक्षण झालं, लग्नं झालं , दीड वर्षांचा त्यांना मुलगा आहे.. आणि आता त्या सातारा मध्ये असतात. काल प्रयोगाच्या निमित्ताने त्या आवर्जून मला भेटल्या... त्यांचा नवरा त्यांना स्वतः असं म्हणाला की, बाळ झोपलं असेल तर नक्की भेटून ये जा.. आणि आमची भेट झाली आणि त्यांनी मला हे सग्गळं स्वतः सांगितलं… दीड वर्षांच्या झोपलेल्या बाळाला घरी ठेउन अगदी साध्या वेशात आलेली ती आई मला हे सगळं सांगुन गेली. कित्ती गोड आहे यार हे प्रेक्षक आणि कलाकार यांचा अनेक वर्षं एकत्रं होणाऱ्या या प्रवासाचंही मला कौतुक वाटलं…. त्यांना मला हे मनमोकळेपणानं सांगावं वाटलं या भावनांचंही मला फार फार कौतुक वाटलं .. आणि बाळ झोपलं असेल तर त्यांना भेटून ये , बोल .. हे म्हणनाऱ्या त्यांच्या नवऱ्याच्या समजुतदारपणाचंही मला खूपच कौतुक वाटलं.. माझ्या नावावरुन त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव पण विष्णूचं ठेवलंय हे तर काहीच्या काही मस्तं वाटलं …. प्रेक्षकहो .. असंच प्रेम करत रहा .. भेटत रहा …. मी जबाबदारीने काम करीन (त्यांचं नाव , फोटो मुद्दाम टाकला नाही पण पोस्टं मात्रं त्यांच्या परवानगीनेच करतोय!)



हेही वाचा : किसमे कितना है दम... तीन साऊथ सुपरस्टारशी भिडणार शाहरुख; जमेल का त्याला ही भूमिका?


संकर्षच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तो अनेक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन करताना दिसतो. त्याशिवाय त्याची ‘तू म्हणशील तसं’, ‘नियम व अटी लागू’ ही नाटकं आणि ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ ही नाटकं देखील चांगलीच सुरु आहेत.