Sankarshan Karhade : छोट्या पडद्यावरील 'चला हवा येऊ द्या' हा कॉमेडी शो प्रेक्षकांना चांगलाच हसवताना दिसतो. या कार्यक्रमातील कलाकार त्यांच्या विनोदानं सगळ्यांच्या मनावर छाप सोडताना दिसतात. त्यात या कार्यक्रमाचं सुत्रसंचालन देखील अनेकांना आवडत. या कार्यक्रमाच्या सुत्रसंचालकाविषयी काही सांगायची गरज नाही. कारण संकर्षण कऱ्हाडेला सगळेच ओळखतात. त्याचे लाखो चाहते आहेत. संकर्षण हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. नुकतीच संकर्षणनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संकर्षणनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये संकर्षणनं त्याच्या मुलीचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्याची लेक स्राग्वी दिसत आहे. यावेळी स्राग्वी ही संकर्षणचा फोटो घेऊन बसल्याचे दिसत आहे. तर हा फोटो शेअर करत संकर्षणनं बाबा घरी नसताना बाबाच्या फोटोशी गप्पा असं कॅप्शन दिलं आहे. संकर्षणनं शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. संकर्षणच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'किती गोड आहे दादा तुमची मुलगी मस्त आणि काळजी घेणारी दिसतेय तुमच्यासारखी.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'हुबेहुब तुझ्यासारखी दिसते.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'किती गोड... शेवटी मुली आपल्या वडिलांच्या जास्त जवळ असतातच.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'किती गोंडस आहे ती.' याशिवाय संकर्षणच्या या पोस्टवर कमेंट करत अनेकांनी गोड असं म्हटलं आहे. तिसरा नेटकरी म्हणाला की, 'कोणतीही मुलगी ही तिच्या वडिलांवर जास्त प्रेम करते.' तर याशिवाय अभिनेत्री मृण्मयी देशमुखनं संकर्षणच्या या पोस्टवर कमेंट करत हार्ट इमोजी शेअर केलं आहे. 



हेही वाचा : नवीन वडील मागवूया, कंटाळा आला तर 30 दिवसात...; Genelia Deshmukh च्या Trial Period चा भन्नाट ट्रेलर पाहिलात का?


संकर्षण हा मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. तो सतत त्याच्या नाटक, मालिका आणि चला हवा येऊ द्यामध्ये व्यस्त असतो. त्याचे सतत अनेक कार्यक्रम सुरु असल्याचे दिसते. त्यासगळ्यामुळे संकर्षणला त्याच्या दोन्ही मुलांसोबत वेळ मिळत नाही. अशात संकर्षणची लेक तिला जेव्हा बाबाची आठवण येते तेव्हा ती त्याचा फोटो घेऊन बसत असेल असं नेटकऱ्यांना वाटते.