Ratan Rajput Casting Couch Experience : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आणि व्लॉगर रतन राजपूतनं चांगलीच चर्चेत असते. रतननं महाभारत आणि संतोषी मां या मालिकांमध्ये काम केलं आहे. रतन राजपुतनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कास्टिंग काऊंचचा अनुभव सांगितला आहे. त्यात ती म्हणाली की नवीन पीढीला कळलं पाहिजे की पडद्याच्या या बाजुला काय होतय. ऑडिशनवेळी कशा प्रकारे तिच्या कोल्ड ड्रिंकमध्ये ड्रग्स मिक्स करून तिला दिले होते. याविषयी सविस्तर माहिती रतननं या मुलाखतीत दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रतनला माहित नसताना कशा प्रकारे तिला ड्रग्स देण्यात आले. रतननं सांगितलं की तिचा हा खूप भयानक अनुभव होतो. यासोबत नवीन मुलांना सतर्कतेचा इशारा देत रतननं काम शोधताना या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे असे देखील सांगितले आहे. रतन राजपूतनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की "ओशिवारात एक हॉटेल होतं आणि तिथेच सगळ्यांचे ऑडिशन व्हायचं. मी पण तिथे ऑडिशन देण्यासाठी गेली होती. पण तिथे दिग्दर्शक उपस्थित नव्हते. एक खालच्या लेव्हलचा कॉर्डिनेटर माझं ऑडिशन घेण्यासाठी तिथे आला होता. त्यानं ऑडिशन पाहिल्यानंतर मला सांगितलं की की मी खूप चांगलं काम केलं आहे. सर फक्त तुमच्याविषयीच बोलतत होते मॅम. तुम्हालाच ही भूमिका मिळणार. मी म्हटलं ठीत आहे, मला एक सवय होती की मी कधीच एकटी जायचे नाही. त्या दिवशी पण एका मित्राला माझ्यासोबत घेऊन गेले होते. माझा तो मित्र डान्ससाठी ऑडिशन देण्यासाठी आला होता." 



रतन पुढे म्हणाली की, "कॉर्डिनेटरनं सांगितलं की स्क्रिप्टसोबत घेऊन जा आणि मीटिंगसाठी तयार रहा. तिला कळत नव्हत की नक्की काय झालं आहे. त्यानंतर रतन तिच्या मित्रासोबत दुसऱ्या हॉटेलमध्ये गेली आणि तिथे आत जाण्याआधी तिला एक कोल्ड ड्रिंक ऑफ करण्यात आलं. तिला सतत सांगण्यात आलं जबरदस्ती कोल्ड ड्रिंक पी सांगितलं, त्यानंतर तिनं कोल्ड ड्रिंकचा एक घोट पिला. तिला सांगितलं की तिला आणखी एका ऑडिशनसाठी बोलावण्यात येईल, त्यानंतर रतन आणि तिचा मित्र घरी परतले."


हेही वाचा : अभिनेत्रीचा तरुणाला अडवून अश्लील डान्स, 'हेच पुरुषाने केले असते तर..?' नेटकऱ्यांचा संताप


घरी परतल्यानंतर काय झालं याविषयी सांगत रतन पुढे म्हणाली, "घरी आल्यावर त्या दोघांना वाटू लागलं की कोल्ड ड्रिंकमध्ये काहीतरी मिक्स केलं होतं. कारण त्या दोघांना विचित्र वाटतं होतं. त्यानंतर तिला दुसऱ्या ऑडिशनसाठी कॉल आला आणि जी स्क्रिप्ट पाठवली होती त्यात काही नव्हतं. रतन तरी तिच्या मित्रासोबत ऑडिशनलाा पोहोचली. ती जागा खूप विचित्र होती. त्याजागी मी पोहोचली तर सगळीकडे पसारा होता. लायटिंग खूप खराब होती आणि सगळीकडे कपडे पसरलेले होते. मी पाहिलं की एका जागी एक मुलगी बेशुद्ध अवस्थेत पडलीये. तिनं जास्त नशा केलं असं मला वाटलं. मला याची जाणीव झाली की तिथे जे काही होणार होतं ते आधीच झालं आहे." तर एक व्यक्ती तिच्यावर ओरडू लागला की बॉयफ्रेंडला सोबत का घेऊन आलीस. त्यानंतर रतननं त्याला सांगितलं की तो तिचा भाऊ आहे. त्यानंतर ती म्हणाली कोल्ड ड्रिंकमध्ये काही तरी होतं म्हणून तुम्हाला कळत नाही आहे आणि ती तिथून निघाली.