नवी दिल्ली : हरियाणाची डान्सर सपना चौधरी सोशल मीडियात नेहमी चर्चेत असते. तिच्या फोटो आणि व्हिडिओवर खूप साऱ्या चर्चा रंगतात. 'बिग बॉस'मधून बाहेर आल्यानंतर तिला खूप कामंही मिळू लागली आहेत. ती आता पहिल्यापेक्षा जास्त स्टेज शो करू लागलीय. तिचे डान्सचे व्हिडिओ अपलोड केल्याकेल्या व्हायरलही होऊ लागले आहेत.


खली बनला फॅन

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिने आपल्या डान्सचे रंग रेसलिंगच्या रिंगमध्येही उधळले आहेत. आपल्या अदाकारी दाखवत तिने उपस्थितांचे खूप मनोरंजन केलं.


भारतात सुरू असलेल्या CWE मध्ये तिच्या डान्सची खूप चर्चा रंगली. जेव्हा ती प्रेक्षकांना इम्प्रेस करत होती तेव्हा शेजारीच असलेला द ग्रेट खली तिच्याकडे एकटक पाहत राहिला.


यशाच्या शिखरावर..सपना चौधरी आपल्या बिंधास्त ठुमक्यांसोबतच मस्ती करण्यासाठीही ओळखली जाते. स्वत: आयुष्य ती खूप आनंदाने जगत असते. ही कला तिला चांगलीच अवगत झालीय.


हळूहळू ती यशाच्या शिखरावर जाताना दिसत आहे. स्टेज शो आणि लाईव्ह परफॉर्मेंन्ससोबत ती सोशल मीडियातही आपली हजेरी लावत असते.