पूल साईटवर सपना चौधुरीची ठुमकेबाजी, व्हिडिओ व्हायरल
अभिनेत्री सपना चौधरी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.
मुंबई : प्रसिद्ध हरियाणवी डान्सर, गायक आणि अभिनेत्री सपना चौधरी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. लग्नापासून सपना सतत आपले फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते. सपना चौधरीने आता पुन्हा एक डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. उदित नारायण आणि अनुराधा पौडवाल यांच्या सुपरहिट गाण्यावर 'मेरे ढोलना' या गाण्यावर तलावाच्या मध्यभागी ती डान्स करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये सपना चौधरी लेहेंग्यांमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिचा डान्स पाहून चाहते तिचं कौतुक करीत आहेत.
सपना चौधरीने 'मेरे ढोलना' या गाण्यावर उत्तम डान्स करत असल्याचं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. यादरम्यान अभिनेत्री गुलाबी रंगाच्या लेहेंगामध्ये नाचताना दिसत आहे. सपनाच्या या व्हिडिओला हजारो व्हूज मिळाले असून लोकांनी तिच्या व्हिडिओवर कमेंन्टचा वर्षाव करत आहेत.
लोकप्रियतेत अव्वल
सपना चौधरीचे नाव आता संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. अभिनयाव्यतिरिक्त ती देशभर स्टेज शो करते. इतकंच नाही तर सपनाने बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं आहे. अलीकडेच तिचे बरेच गाण्याचे व्हिडिओ रिलीज झाले आहेत आणि बरेच पेंन्डिंग आहेत. सपना चौधरीने आपल्या करिअरची सुरूवात हरियाणाच्या ऑर्केस्ट्रा पार्टीपासून केली. हळूहळू, तिने हरियाणा आणि जवळपासच्या राज्यांमधील कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली आणि तिची लोकप्रियता वाढतच गेली.